पुणे : गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरुन तसेच समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींच्या वक्तव्याने राजकारण चांगलेच तापले आहे. अबू आझमींनी औरंगजेबाचे कौतुक केल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली असून औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची मागणी केली जात आहे. या मागणीसाठी आज विश्व हिंदू परिषदे आणि बजरंग दल आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले आहे. ‘औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनारवृत्ती होईल’, असे म्हणत या दोन्ही संघटना आक्रमक झाल्या आहेत. औरंगजेबाच्या कबरी विरोधात आक्रमक होत विश्व हिंदू परिषदेकडून आता राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
शिवजयंती म्हणजेच १७ मार्च रोजी विश्व हिंदू परिषद राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कबर हटवा या मागणीसाठी आंदोलन करणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यादिवशी निवेदन देखील देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. ‘राज्यभर एकाच दिवशी औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन होणार असून सकरकारने कबरीबाबत निर्णय घेतला नाही तर मात्र आम्ही बाबरी मशिदीची पुनरावृत्ती करत ती कबर हटवू’ अशा इशारा बजरंग दलाने पुण्यात दिला आहे.
दरम्यान, अबू आझमींनी औरंगजेबाला ‘उत्तम प्रशासक’ म्हटले. त्यांनी औरंगजेबाचे कौतुक केल्यानंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली. तसेच त्यांच्या वक्तव्याविरोधात राज्यात बहुतांश ठिकाणी आंदोलने झाली. अखेर आझमींनी त्यांचं वक्तव्य मागे घेतले. मात्र सध्या सुरु असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील झाली. अशातच आज औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-स्वारगेट बस अत्याचारानंतर अखेर एसटी महामंडळाला आली जाग; ‘त्या’ बसचा होणार भंगारात लिलाव
-सर्वसामान्यांच्या खिशाचा भार वाढला; आजपासून गाय, म्हशीच्या दूध दरात २ रुपयांनी महागले
-पुण्यात महिला असुरक्षितच; स्वारगेट प्रकरणानंतर आता आणखी एका तरुणीवर अत्याचार
-पुणेकरांच्या हितासाठी जगदीश मुळीकांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी