पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील शिरुर आणि मावळ लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्याची सुरवात केली आहे. गुरुवारी अजित पवार यांनी शिरुरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ सभांचा धडाका लावला होता. त्यानंतर मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारर्थही सभा घेतली. यावेळी अजित पवारांनी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर चांगलेच भडकलेले पहायला मिळाले.
सभेत बोलताना आधीच्या वक्त्याने बोलून दाखवलेली खंत याचा धागा पकडून अजित पवारांनी निवडणुकीत गडबड करणाऱ्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी वेळीच सुधारावे नाही तर त्यांची काही खैर नाही, असा सज्जड दमच अजित पवारांनी दिल्याचं पहायला मिळालं. मतदान काही तासांवर येऊन ठेपलं असताना भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगलेला दिसून आला. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंनी दिवसा धनुष्यबाण आणि रात्री मशाल चालवणाऱ्यांची निकालानंतर पोलखोल करणार असल्याचा इशारा दिला आहे.
भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंनी विरोधकांना सुरुंग लावायचा आहे, महायुतीला नाही ना? असा प्रतिप्रश्न शेळकेंना विचारला. तर उद्योगमंत्री उदय सामंत आणि उमेदवार श्रीरंग बारणेंनी महायुतीनं एकदिलाने काम केलं तर विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल, असं म्हणत भाजप-राष्ट्रवादीसह घटक पक्षांना साकडं घातलं. अजित पवारांनी हाच धागा धरला आणि गडबड करणाऱ्यांची खैर नाही, असा सज्जड दम कार्यकर्त्यांना भराला.
“ही निवडणूक देशाची आहे. नात्यागोत्याची नाही. जय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात देशात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाल्यामुळे आम्ही महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. केंद्र शासनाकडून भविष्यात मोठ्या प्रमाणात निधी मिळवायचा असेल तर मावळातून बारणे पुन्हा खासदार होणे आवश्यक आहे. ‘एक घाव, दोन तुकडे’ हा माझा स्वभाव आहे. मावळात फक्त आणि फक्त धनुष्यबाण चालवायचे, अशी पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. तालुक्यातील वरिष्ठ नेते काम करीत असले तरी खालच्या फळीतील काही कार्यकर्ते ‘गडबड’ करताना दिसत आहेत. त्यांनी वेळीच सुधारणा करावी, अन्यथा त्यांचे कामच करून टाकीन”, असे अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पाच वर्ष मतदारसंघात फिरकले नाहीत, आता कोल्हे म्हणतात, “अभिनयातून ब्रेक घेतो पण…”
-‘काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा आमच्यासोबत या’; शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन मोदींची ऑफर
-“आपण कोणत्याही शूटिंगला जाणार नाही, त्यामुळे पूर्णवेळ लोकांसाठी, विकास कामासाठी”- आढळराव पाटील
-मुस्लिमांची जमीन वाचवली त्यांनाच पाठिंबा; अनिस सुंडकेंसाठी एकवटले मुस्लिम धर्मगुरू