पुणे : राज्याभरात गेल्या २-३ महिन्यांत प्रचंड कडाक्याचा उन्हाळ्यामुळे उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यातच आता गेले काही दिवस राज्यातील विविध भागांत जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुणे शहरातही २ दिवस जोरदार पाऊस पडला. पुण्यासह राज्याला पावसाने झोडपून काढलं आहे. पुढील ४ दिवस राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील पुणे, सातारा, चंद्रपूर, यवतमाळ, लातूर, नांदेड जिल्ह्यांमध्ये ऑरेंन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ११ ते १५ जूनपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम जिल्ह्यांना ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात गर्मीने नागरिक हैराण झाले होते. राज्यातील काही भागांत तापमानाने चाळीशी पार केली होती. आणि आता पडलेल्या पावसामुळे राज्याला उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तर पुढचे ४ दिवस मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘मतदान करा अन् निम्म्या किमतीत खा ‘पॉट आईस्क्रिम’; पुण्यात मतदान जनजागृतीसाठी अनोखी शक्कल
-Pune Lok Sabha | शहरातील गुंडांची झाडाझडती; मतदाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेची महत्वाची पाऊले
-“शरद पवारांनी राज्यात जातीपातीचं विष कालवलं पण, अजित पवारांना याबाबतीत…”-राज ठाकरे
-…म्हणून पाकिस्तानची भारतात बॉम्बस्फोट करण्याची हिंमत झाली नाही- देवेंद्र फडणवीस
-“पाच वर्षांपूर्वी पण अभिनय सोडतो म्हंटले पण…”; अमोल कोल्हेंच्या चुनावी जुमल्यावर आढळराव बरसले