श्री स्वामी समर्थ : श्री स्वामी समर्थ महाराज यांश्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वाचा महत्वाचे उपदेश; जीवनात येणार नाहीत समस्याची आज पुण्यतिथी आहे. आज महाराजांची १४६ वी पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट या तिर्थक्षेत्रामध्ये हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.
श्री स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त महाराजांचे उपदेश
‘उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे,
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा’ स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त सर्वांना विनम्र अभिवादन
स्वामी महाराज सांगतात की, यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, तो म्हणजे दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे.
स्वामी समर्थ महाराज म्हणतात की, जिथे तुझी मर्यादा संपते तिथून मी स्वामी समर्थ तुझी साथ देण्यासाठी कायम तत्पर आहे, यावर विश्वास ठेव.
स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ‘जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो कशाची असो भूक त्यासी? तू पुढे काय ठेवितो.’
स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्तांना म्हणतात, मी तुझ्या अंतरात्म्यात आहे. मी तुला कधीच हरू देणार नाही. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. या कलियुगात तुला मी कधीच एकटे सोडणार नाही, जी झुंझ तू खेळतो आहेस, मनाशी त्यामध्ये तुला मार्ग दाखवत असणार आहे त्यामुळे ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
“जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा” त्यामुळे अशक्य ही शक्य करतील स्वामी, यावर नेहमी विश्वास ठेवा. आपण कधी विचारही करु शकत नाही की, खरंच असे काही घडू शकते, ते सकारात्मक प्रसंग स्वामी महाराज आपल्या सोबत घडवून आणतात. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!
महत्वाच्या बातम्या-
-बापाचं पहिल्यांदा लेकीला मतदान; पक्षफुटीनंतर शरद पवार पुन्हा बारामतीतून मतदान करणार
-‘संसदरत्न पुरस्कार मिळवून बारामतीचा विकास होत नसतो’; अजितदादांचा सुप्रिया सुळेंना सणसणीत टोला
-अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याने फोडलं मडकं अन् बारामतीचं राजकारण पेटलं; पहा नेमकं काय झालं?