पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात १९ मे रोजी झालेल्या अपघातामध्ये बिल्डरच्या मुलाने अलिशान कारने भरधाव वेगाने दोघांना चिरडलं. या अपघातामध्ये २ तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुणे अपघातप्रकरणात धनिकपुत्राला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी गैरकृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आला आहे. यानंतर हे अपघात प्रकरण सातत्याने उचलून धरणारे काँग्रेसचे कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन धक्कादायक आरोप केले आहेत.
‘कल्याणीनगरमध्ये ज्या रात्री हा अपघात झाला त्या रात्री केवळ ससून रुग्णालयातील डॉक्टरांनीच नव्हे तर अनेकांनी ईमान विकले’, असे रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत. रवींद्र धंगेरकर यांच्या या वक्तव्यावरुन चांगलंच राजकारण तापले आहे. रवींद्र धंगेकर यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
काय म्हणाले रवींद्र धंगेकर?
पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात ससुन रुग्णालयाच्या 2 डाॕक्टरांना अटक करण्यात आली आहे.
ब्लड रिपोर्ट मधे फेरफार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.तुम्हाला आम्हाला काही तासात मिळणारे ब्लड रिपोर्ट या केसमध्ये जेव्हा ७ दिवस होऊनही मिळत नव्हते तेव्हाच हा प्रकार संशयास्पद वाटत…
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarINC) May 27, 2024
“पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात ससुन रुग्णालयाच्या २ डाॕक्टरांना अटक करण्यात आली आहे. ब्लड रिपोर्टमधे फेरफार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तुम्हाला आम्हाला काही तासात मिळणारे ब्लड रिपोर्ट या केसमध्ये जेव्हा ७ दिवस होऊनही मिळत नव्हते तेव्हाच हा प्रकार संशयास्पद वाटत होता. याच ससून मध्ये मयत अश्विनी कोस्टा यांच्या नातेवाईकांनी मृतदेह अजून अर्धा तास शवगृहात ठेवा आमची अँब्युलन्स येत आहे, अशी विनंती केली होती. मात्र रुग्णालय प्रशासनाने अर्धा तास वाढवून द्यायला देखील नकार दिला होता. असो, हे वाटतं तेव्हढ सोप्पं नाहीये. त्या रात्री अनेकांनी आपले ईमान विकले आहेत. जे आता हळू हळू जगासमोर येतील”, असे म्हणत रवींद्र धंगेकर यांनी संपूर्ण प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“दादागिरीने राजकारण होत नाही, नाहीतर अरुण गवळी मुख्यमंत्री झाले असते”