पुणे : पुण्यातील एफसी रोडवरील नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी सुरु होती. या ड्रग्ज पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरुन राजकीय वादही उभा राहिला आहे. या प्रकरणावरुन आता पुन्हा एकदा काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी राज्य उत्पादन शुल्क कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर आगपाखड केली आहे. पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरुन रविंद्र धंगेकर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शंभूराज देसाई यांना धारेवर धरले आहे.
पुण्याची पुढची पिढी बरबाद करणारे ‘देसाई’ हे पुण्यासाठी ‘कसाई’च आहेत. शिवाजीनगर परिसरात एक पब पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असतो व त्या अल्पवयीन पबमध्ये मुले ड्रग्सचे सेवन करत असतानाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. शिवाजीनगर या परिसरामध्ये सर्वाधिक कॉलेज व शाळा आहेत. अशा परिसरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्सचे सेवन होत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, भ्रष्टाचारी राजपूत हे काय झोपा काढतात का…? तुमचा खिसा भरण्याच्या नादात आमची पोरं बरबाद होत आहेत. देसाई साहेब अजूनही तुम्हाला संधी आहे…कारवाई करा… नाहीतर या राजपूत पायी तुम्ही मंत्रीपद गमवाल, असे रविंद्र धंगेकर म्हणाले आहे.
पुण्याची पुढची पिढी बरबाद करणारे “देसाई” हे पुण्यासाठी “कसाई ” च आहेत.
शिवाजीनगर परिसरात एक पब पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असतो व त्या अल्पवयीन पबमध्ये मुले ड्रग्सचे सेवन करत असतानाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
शिवाजीनगर या परिसरामध्ये सर्वाधिक कॉलेज व शाळा आहेत. अशा परिसरामध्ये… pic.twitter.com/TLQMe2ZIbX— Ravindra Dhangekar Official (@DhangekarINC) June 23, 2024
“जेव्हा कोट्यवधींचे ड्रग्जचे साठे सापडले होते. तेव्हाही आम्ही शंभुराजे देसाई आणि गृहमंत्र्यांना प्रश्न विचारले होते. शंभूराज देसाई यांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. शंभूराज देसाई यांच्यासाठी करणारे उत्पादन शुल्कचे अधिकारी राजपूत यांचेही निलंबन झाले पाहिजे. हे झाल्याशिवाय पुणे सुधारणार नाही”, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात ‘नाईट लाईफ’ला बंदी नाहीच; शहरातील ‘त्या’ हॉटेलमध्ये पहाटेपर्यंत मद्य अन् ड्रग्ज पार्टी
-आरक्षणाचा तिढा सुटणार? ओमराजे निंबाळकरांनी सुचवला ‘हा’ मार्ग