पुणे : पुणे हिट अँड रन प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि पुणे पोलिसांना या प्रकरणावरुन वारंवार झापणारे, अनेक गंभीर आरोप करणारे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरा यांच्या अडचणीत आता वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर आणि उत्पादन शुल्क विभागावर आणि पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांवर केलेले आरोप यासाठी रवींद्र धंगेकरांना कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
शंभूराज देसाई रवींद्र धंगेकरांना याप्रकरणी नोटीस धाडणार असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडेही तक्रार करण्यात येणार आहे. पुणे कार अपघात प्रकरणी धंगेकर यांनी आरोप केले होते. याच आरोपांवरून आता धंगेकरांना करावा लागणार कायदेशीर बाबींचा सामना करावा लागू शकतो.
दरम्यान, पुणे अपघात प्रकरणी रवींद्र धंगेकर यांनी या घटनेतील आरोपीला वाचवण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न झाले आणि याच सर्व दोषींवर कारवाई व्हावी या उद्देशाने सत्ताधारी तसेच पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ कृत्यावरुन पुण्यात शिवसेना आक्रमक; हडपसरमध्ये तीव्र आंदोलन
-‘जितेंद्र आव्हाडांबद्दल तुम्हाला आक्षेप असतील तर…’; सुषमा अंधारेंनी केली आव्हाडांची पाठराखण
-राज्य उत्पादन शुल्कचे अधिक्षक चरणसिंह राजपूत अचणीत; होणार कारवाई?
-जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढणार, डॉ. बाबासाहेबांचा फोटो फाडण महागात पडणार? नेमकं काय घडलं?