पुणे : पुणे शहरामध्ये ड्रग्ज पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणावरुन पुन्हा एकदा राजकीय वाद उफाळला आहे. सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी पब आणि बार मालकांचे पोलिसांशी अर्थिक हितसंबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. धंगेकारांनी केलेल्या आरोपावरुन राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
रविंद्र धंगेकरांनी यापूर्वी अनेक बार मालकांचे आणि हप्त्यांचे कागद दाखवले होते. त्याचे पुढे काय झाल? एक प्रकरण धरतात सोडून देतात. दुसरे धरतात सोडून देतात? त्या कागदाचे काय झाले ते आधी सांगा?, असे म्हणत मेधा कुलकर्णी यांनी धंगेकरांना धारेवर धरले आहे. त्यावर ‘आम्ही एखादा मुद्दा उपस्थित करतो आणि शेवटपर्यंत नेतो, मध्येच सोडत नाही’, असा टोला रविंद्र धंगेकरांना मेधा कुलकर्णींनी लगावला आहे.
“पुण्याची प्रतिमा मलिन होऊ देणार नाही त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काम करणार आहे. पुण्यातील ड्रग प्रकरणावर पुणे पोलीस धडधड कारवाई करत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणात योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत”, असे मेधा कुलकर्णी यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शरद पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र म्हणाले, “निवडणूक यादीतून ‘पिपाणी’ हटवा अन्यथा…”
-Weather Update: महाराष्ट्रात मान्सून दमदार; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज
-पुणे ड्रग्ज पार्टी: सामाजिक संघटनांचा आक्रमक पवित्रा; एल थ्री बारवर पतीत पावन संघटनेकडून दगडफेक
-‘मी पालकमंत्री होतो तेव्हा…’; चंद्रकांत पाटलांनी नाव न घेता अजित पवारांवर साधला निशाणा
-पुणे ड्रग्ज प्रकरण पुन्हा चर्चेत; या प्रकरणात महिला अन् परदेशी नागरिकांचाही समावेश