पुणे : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारने सादर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ राज्यात जाहीर केली आहे. भाजपसह महायुतीतील पक्ष लाडकी बहिणी या योजनेची गुणगान गात असतानाच काँग्रेससह विरोधकांकडून या योजनेवर टीका करण्यात येत आहे. अशातच काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी लाडक्या बहीण योजनेचे लावलेले पोस्टर सध्या चर्चेत आहेत.
रवींद्र धंगेकर यांनी लाडकी बहीण योजनेचे पोस्टर संपूर्ण कसबा विधानसभा मतदारसंघात लावले आहेत. या पोस्टरच्या माध्यमातून योजनेचे फायदे तसेच लागणारी कागदपत्रे याबाबतची माहिती दिली आहे. त्या पोस्टरवर रविंद्र धंगेकर यांचा मोठा फोटो तसेच त्यांच्या पत्नीचाही फोटो पाहायला मिळत आहे. पोस्टरच्या वरच्या बाजूस काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे फोटो आहेत.
रवींद्र धंगेकरांनी कसबा मतदारसंघामध्ये लावलेल्या लावलेल्या पोस्टरमध्ये मुख्यमंत्र्यांचा अथवा राज्य सरकार मधील कोणत्याही नेत्यांचा फोटो लावणे धंगेकर यांनी टाळले आहे. ही योजना राबवून त्याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला कसा मिळेल, या हेतूने ही पोस्टरबाची रवींद्र धंगेकर यांनी केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सभागृहात मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन भास्कर जाधवही संतापले; म्हणाले, “चेंबरमध्ये बसून लोकांचे…”
-अजित पवार गटातील नेते शरद पवार गटात येणार? शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
-वसंत मोरेंनी बांधलं शिवबंधन; पक्षप्रवेश होताच मोरे म्हणाले, ‘मी पक्षात प्रवेश केला नाही तर…’