मुंबई : भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण जगभरातून त्यांना श्रद्धांजली देण्यात आली. सर्व स्तरातील जवळपास प्रत्येकाने सोशल मिडीयावर पोस्ट करत रतन टाटा यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सिनेविश्वातील कलाकार मंडळीनीदेखील टाटा यांना पोस्टच्या माध्यमातून निरोप दिला. यामध्ये एक खास पोस्ट आहे ती ज्येष्ठ अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांची. सिमी ग्रेवाल यांच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांचे रतन टाटांशी खूप खास नाते होते. सिमी ग्रेवाल या रतन टाटा यांच्या प्रेयसी होत्या. हे नाते अभिनेत्रीने अनेकदा मान्यही केले होते.
They say you have gone ..
It’s too hard to bear your loss..too hard.. Farewell my friend..#RatanTata pic.twitter.com/FTC4wzkFoV— Simi_Garewal (@Simi_Garewal) October 9, 2024
रतन टाटा यांच्या पूर्वीच्या प्रेयसी असणाऱ्या सिमी यांनी असे लिहिले आहे की, ‘ते म्हणतायंत तू निघून गेला आहेस. तुझ्या जाण्याने झालेले नुकसान सहन करणे खूप कठीण आहे… खूपच कठीण. अलविदा मित्रा’, असे म्हणत सिमी यांनी त्यांचा आणि रतन टाटा यांचा एक फोटोही या पोस्टसोबत शेअर केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांसाठी खुशखबर! 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी निघाली; पहा कसा करायचा अर्ज
-ऐन विधानसभेच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; संजय काकडे घेणार हाती ‘तुतारी’