पुणे : पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठलाय. पुणे शहरातील के.के. मार्केट परिसरातील एका अल्पवयीन मुलीला डांबून ठेवून तिच्यावर अत्याचार केल्याच्या प्रकरणाला २ दिवसही उलटले नाहीत तोच पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी आणखी एक घटना घडली आहे. पुण्यातील जंगली महाराज रोडवर राहणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. त्यातच आता आणखी एक बलात्काराची घटना समोर आली आहे. या घटनांमुळे महिला सुरक्षित नसल्याचं स्पष्ट चित्र आहे.
खराडी सारख्या उच्चभ्रू परिसरात शुक्रवारी सकाळी साडे आठच्या सुमारास एका तरुणाने एका तरुणीला पिस्तुलाचा धाक दाखवून तिला जबरदस्तीने कारमधून पळवून नेले. तिच्यासोबत लग्न करुन शारीरिक संबंध ठेवले. हा प्रकार खराडी येथील झेन्सार चौकातील बस स्टॉप व दस्तुरवाडी गावच्या हद्दीत घडला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे.
वाघोली येथे राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून महेंद्र सीताराम वेताळ (रा. भावडी ता. हवेली) आणि अमोल जाधव (रा. लोणीकंद ता. हवेली) यांच्यावर बलात्कारासह आर्म अॅक्ट आणि अॅट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला असून महेंद्र वेताळ याला शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास पोलिसांनी अटक केली. हा गुन्हा लोणीकंद पोलिसांकडून चंदननगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी गुरुवारी सकाळी खराडी येथील झेन्सार चौकातील बस स्टॉप येथे जात होती. त्यावेळी अचानक एक चारचाकी (एमएच १२ व्हीएफ २६४८) तिच्याजवळ येऊन थांबली. आरोपींनी तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून पिस्तुलाचा आणि कोयत्याचा धाक दाखवला. तिचे अपहरण करुन आरोपी महेंद्र वेताळ याने तिच्यासोबत जबरदस्तीने लग्न करुन लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. यानंतर नाशिक रोडने दस्तुरवाडी गावच्या हद्दीतील एका डोंगरावर नेऊन पीडितेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
पीडितेला जातीवाचक शिवीगाळ करुन दुसऱ्या दिवशी तुळापुर फाटा येथे आणून सोडून देऊन आरोपी पळून गेले. यानंतर तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात फिर्याद दिली. या प्रकरणाचा पुढील तपास येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील करत आहेत. या सर्व घटनांमुळे महिलां असुरक्षित असल्याचं स्पष्ट चित्र दिसत आहे. यावर सर्व घटनांतील आरोपींवर प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात यावी ही सर्वसामान्यांची इच्छा आहे.
महत्वाच्या बातम्या-
-धक्कादायक! दारुच्या नशेत नराधमानं फुटपाथवरील महिलेवर केला बलात्कार
-पोलीस काढणार गुंडांची ‘डिजीटल कुंडली’; दलात ‘क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट’ची स्थापना
-स्टंटबाजी करणं दोघांना पडलं महागात; पोलिसांनी ताब्यात घेत केली कायदेशीर कारवाई
-‘मीच एकटा आहे, हे भासवणं म्हणजे लोकांना भावनिक होणं’; काकांनी सांगितला ‘भावनिक’ शब्दाचा अर्थ