पुणे : राज्यात विधानसभा पार पडल्यानंतर जनतेने दिलेला कौल अनपेक्षित होता. महायुतीला मिळालेलं बहुमत पाहता महाविकास आघाडीने पाहिलेल्या स्वप्नांची जनतेनं रागोळी केल्याचे दिसून आले. महाविकास आघाडीने मोठा परभव मिळाल्यानंतरही हार मान्य न करता ईव्हीएमवर आक्षेप घेत महायुतीवर टीकेची झोड उठवली. अशातच आता पिंपरी-चिंचवडमधील निगडी येथे भाजपचे आमदार शंकर जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या सत्कार समारंभात भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी विरोधकांवर टीका केली.
‘महाविकास आघाडीने विजयाची स्वप्ने पाहिली. कुठल्या नेत्याला कुठलं खातं द्यायचं. कोणाला मंत्रिपद द्यायचं. कोणाला जेलमध्ये टाकायचं हे सर्व ठरवलं होतं. पण, जनता सुज्ञ असल्याने मतदारांनी आम्हाला कौल दिला.विरोधकांना पराभवाचे कारण शोधता येत नसल्याने ते ईव्हीएमला दोष देत आहेत’, असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी विरोधकांवर ताशेरे ओढले आहेत.
‘विरोधक अद्याप ही हार मानायला तयार नाहीत. ते आता ईव्हीएमला दोष देत आहेत. ते नागरिकांना काही बोलू शकत नाहीत. गेल्या ४५ वर्षात आम्ही अनेक निवडणुका पाहिल्या, लढलो, हार पत्करली. पण, आम्ही कधी संशय घेतला नाही. आता विजयी झालो तर विरोधक ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करत आहेत. लोकसभेत आम्हाला अपयश आलं. हरियाणा, कर्नाटकमध्ये हरलो. तेव्हा आम्ही संशय व्यक्त केला नाही’, असे रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-फडणवीस आज पुण्यातील मंत्री करणार फिक्स! कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?
-‘पवार साहेबांनी निर्णय घेतला तर सगळेच एकत्र येतील’; शरद पवारांच्या प्रवक्त्याचा दावा
-पुण्यातील ‘ही’ बँक बनली मंदिर! साडे ३ किलो दत्त मुर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
-महापालिका निवडणूक कधी होणार? इच्छुकांचे जीव टांगणीला, पडद्यामागे काय घडतंय?
-काका-पुतणे एकत्र येण्यासाठी पवार कुटुंबीय सरसावले, रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य