पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलिसांनी कारावाया करत देशातील सर्वात मोठं ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणलं आहे. पुणे पोलिसांच्या या कारवाईने शहरच नाही तर संपूर्ण देश हादरुन गेला आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर असा आतापर्यंत उल्लेख करण्यात आला आहे. मात्र या ड्रग्ज प्रकरणावरुन पुण्याला ड्रग्जचा अड्डा, गुन्हेगारी शहर असा उल्लेख सहज केला जात आहे. त्यातच राज्यातील विविध भागातून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना अद्यापही या गोष्टीचे गांभिर्य नसल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे. पुण्यातील तरुणींना ड्रग्स घेतलेला भयंकर व्हिडीओ समोर आला आहे.
पुण्यातील वेताळ टेकडीवरचा हा व्हिडीओ अभिनेते रमेश परदेसी यांनी समोर आणला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील २ महाविद्यालयीन तरुणी दारुच्या, ड्रग्जच्या नशेत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. २ तरुणी ड्रग्सच्या आहारी गेल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. यामध्ये एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत आहे, तर दुसरीला धड बोलताही येत नाही. या मुली सातारा भागातील असून त्या लॉ च्या शिक्षणासाठी पुण्यात आल्या असल्याचं रमेश परदेशी सांगत आहेत. या सर्व प्रकारामुळे शिक्षणासाठी पुण्यात आलेली तरुणाई नेमकी कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
View this post on Instagram
रमेश परदेसी यांनी हा सगळा प्रकार लाईव्ह शेअर करत या प्रकरणावरुन पालकांना प्रश्न विचारला आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की, ‘वेताळ टेकडीवर आम्ही पळायला आलो होतो. तर इथं महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या या दोन तरुणी बियर, दारु आणि नशेचं काहीतरी घेऊन टेकडीच्या कोपऱ्यात पडल्या होत्या. या तरुणींना आम्ही इथं सेफ जागी घेऊन आलो. हे यासाठी सांगतोय कारण पुण्यात दोन दिवसांपूर्वी 4 हजार कोटींचं ड्रग्ज सापडलं आहे.’
महत्वाच्या बातम्या-
-‘यंदाच्या निवडणुकीत ४० हजार मतांनी निवडणून येणार’; शहाजी बापू पाटलांचा विश्वास
-बारामतीच्या राजकारणाला वेग; सुनेत्रा पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
-पुणे ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार संदीप धुनिया; एटीएस, एनआयए, सीबीआय, एनसीबीकडून देखील तपास
-घरबसल्या करता येणार मतदान; यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशभर सुविधा, वाचा..