इंदापूर : बारामती लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आता शिवसेनेची महिला आघाडी देखील मैदानात उतरल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांची बारामतीमधील तादक वाढताना दिसत आहे. यावेळी बोला ‘रामकृष्ण हरी, ताई पेक्षा आमची वाहिनीच भारी’ अशा घोषणा शिवसेनेच्या पुणे जिल्हा महिला पदाधीकाऱ्यांनी दिल्या आहेत.
सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सुरवात आज इंदापूरमधून सुरवात करण्यात आली आहे. शिवसेनेच्या पुणे जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे शिवसेनेच्या पुणे जिल्हा अध्यक्ष सीमा कल्याणकर, गीतांजली ढोणे, मंगेश चिवटे, राम भाई राऊत तसेच शिवसेना वैद्यकीय कक्षाचे व्यवस्थापक वा पदाधिकारी उपस्थित होते.
“बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी महायुतीचा घटक पक्ष म्हणून आम्ही आज आठवडे बाजारा पासून सुरूवात केली आहे. आठवडे बाजारामध्ये पत्रक वाटून महिलांनी सुनेत्रा पवार यांना अधिक मतदान करून विजयी करण्याचे आवाहन अध्यक्ष सीमा कल्याणकर म्हणाल्या आहेत.
“आपण कुठल्याही गावात गेलो तर आपल्या घरातली जेष्ठ मंडळी, वडीलधारी माणसं ही ‘राम कृष्ण हरी’ म्हणतातच. मात्र विरोधकांनी त्याच्यासोबत आणखीन एक वाक्य जोडून स्वतःची घोषणा तयार केली आहे. त्याच्यापुढे जाऊन आम्ही आता म्हणणार आहे ‘राम कृष्ण हरी ताई पेक्षा आपली वहिनीच भारी’ आणि आता आपल्या वहिनी लवकरच दिल्लीमध्ये जातील”, असा विश्वास देखील सीमा कल्याणकर यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘जय लहान आहे, माझ्या मुलासारखा’; सुप्रिया सुळेंचं जय पवारांच्या त्या टीकेला प्रत्युत्तर
-‘आढळराव पाटलांना प्रत्येक ग्रामस्थाचं मत म्हणजे मंचरच्या विकासाला मत’ मंचरच्या बैठकीत सूर
-‘माझ्या भावाच्या पराभवाचा बदला मी घेणारच’; रोहित पवारांनी उचलला बारणेंच्या पराभवाचा विडा
-पुण्यातील मुकुंदनगर येथील केशव व्यंकटेश चाफेकर क्रीडागृहात आग