Rakhi Sawant : बॉलिवूड क्षेत्रातील कॉन्ट्रावर्शिअल म्हणून प्रसिद्ध असणारी अभिनेत्री राखी सावंतला मंगळवारपासून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. अचानक छातीत आणि पोटात दुखत असल्याने राखीला रुग्णालयामध्ये दाखल केल्याचे सांगण्यात आले आहे. राखीचा पूर्वाश्रमीचा पती रितेश सिंग राखीच्या प्रकृतीबद्दल अपडेट शेअर करत आहे. तिच्या गर्भाशयात ट्यूमर आहे. या ट्यूमरसाठी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं याआधी रितेशने सांगितले होते.
राखी सावंतच्या आजारपणाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. रितेशने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राखीला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जात असल्याचे दिसत आहे. तसेच राखीने गुलाबी रंगाचा रुग्णांचा पोशाख घातला आहे. तिच्याबरोबर दोन परिचारिका आहेत. रितेशने हा व्हिडीओ शेअर करत या व्हिडीओला कॅप्शन देत लिहिलं की, “राखी म्हणाली, मला खूप रडायला येतंय पण मला देवावर विश्वास आहे की ते माझं वाईट कधीच करणार नाहीत.”
View this post on Instagram
राखी सावंतचा आणखी एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंत स्वत: चाहत्यांना तिच्या प्रकृतीबद्दल सांगताना दिसत आहे. राखी म्हणते, “नमस्कार, शेवटी तो टप्पा आलाच, मी आता ऑपरेशन थिएटरमध्ये जात आहे. मी हसत हसत जाणार आहे आणि हसत हसत येणार आहे. आजपर्यंत मी खूप मोठमोठ्या दुःखांचा मी सामना केला आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा. आई तू कुठे आहेस. मला तूझी खूप गरज आहे. मला खूप वेदना होत आहेत.”
महत्वाच्या बातम्या-
-अभी भी दिल जवान है! भोरच्या आजोबांचा असा काही साजरा केला १११ वा वाढदिवस…
-आयफोन प्रेमींसाठी खुशखबर! आयफोनच्या ‘या’ मॉडेलवर मिळतेय 22 हजार रुपयांची सूट
-आधी धंगेकर आता भाजप अन् राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, पोलीस ठाण्याबाहेरील राडा भोवणार
-हजारो कोटींच्या बेटिंग अॅपच पुणे कनेक्शन, ४५ लॅपटॉप, ८९ मोबाइल अन् ४५२ बँक पासबुक; नेमका विषय काय?
-पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, पाणीकपातीचं संकट टळलं? वाचा काय झाला बैठकीत निर्णय