पुणे: लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघा भाजपाला घवघवीत यश मिळाल होत. पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या कोथरूडमध्ये जवळपास 74 हजारांचे वर विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना मताधिक्य मिळाला होत. हाच पॅटर्न विधानसभेत कायम ठेवण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे.
“मोहोळ यांना बाणेर बालेवाडीतून २२ हजारांचे मताधिक्य मिळाले. हाच पॅटर्न कायम ठेवत विधानसभा निवडणुकीत प्रभाग ९ मधून सर्वाधिक मताधिक्य मिळाले पाहिजे”, असा विश्वास राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केला. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या बाणेर बालेवाडी तील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन मेधा कुलकर्णी, चंद्रकांत पाटील, माधव भंडारी यांच्या हस्ते झाले. यानंतर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
प्रा डॉ मेधाताई कुलकर्णी म्हणाल्या की, बाणेर बालेवाडी या भागाने भाजपा-महायुतीवर भरभरुन प्रेम केले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मनात प्रचंड धाकधुक होती. कारण, त्यापूर्वी महापालिकेच्या माध्यमातून एका ठराविक भागातून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. पण २०१४ पासून या भागातून जे प्रेम आणि विश्वास मिळाला, तो अवर्णनीय आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ही या प्रभागातून मुरलीधर मोहोळ यांना २२ हजारांचे मताधिक्य मिळाले. विधानसभा निवडणुकीत हाच पॅटर्न कायम ठेवला पाहिजे.