पुणे : सध्या राज्याच्या राजकारणात गाजत असलेला आणि सर्वसामान्यांच्याही चर्चेत असलेला विषय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फूट आणि बारामती लोकसभेची निवडणूक. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातील नागरिकांना भावनिक आवाहन केले. त्यानंतर त्यांनी जनतेला भावनिक पत्रही लिहले आहे.
अजित पवारांच्या पत्रानंतर आता आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी निनावी पत्र लिहले आहे. अजित पवार यांनी भाव-भावकीच्या तालावर आणून ठेवलीय, आशा मथळ्याखाली निनावी पत्र लिहण्यात आले आहे. बारामतीकरांची भूमिका या नावाने हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या पत्रावर राजेंद्र पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जेव्हा लोकांना दाबावातून व्यक्त होता येत नाही तेव्हा पत्रातून व्यक्त होतात. जर मी तेव्हा राजकारणात आलो असतो तर तेव्हाच आताची परिस्थिती निर्माण झाली असती, असं सांगत राजेंद्र पवार यांनी अनेक राजकीय जुन्या गोष्टी राजेंद्र पवार यांनी सांगितल्या आहेत.
“मला एका साखर कारखान्याची निवडणूक लढविण्याची इच्छा होती. पण शरद पवार यांनी मला जाणीवपूर्वक दूर ठेवले. तेव्हा जर मी तेव्हा राजकारणात आलो असतो तर तेव्हाच आताची परिस्थिती निर्माण झाली असती. १९९० च्या दरम्यान मी राजकारणात आलो असतो पण नाही आलो. ज्यावेळी लोकांना दडपशाही झाली असं वाटतं तेव्हा लोक निनावी पत्र वाटायला सुरुवात करतात, असं मला वाटतं. काही बारामतीकरांची खदखद या पत्रातून बाहेर पडत आहे”, असे राजेंद्र पवार म्हणाले आहेत.
“अजित पवार आणि मी दोघंही एकाच वयाचे आहोत. १९८७ नंतर अजित पवार राजकारणात आले. त्यानंतर ते पुढे गेले. मी शरद पवाराचा पुतण्या आहे. त्यामुळे लोकांना असं वाटलं असेल की मलादेखील राजकारणाची आवड आहे. पण मी परदेशातून आल्यानंतर शेती करत होतो. मी सतत राजकारणात राहिलो असतो तर शेतीकडे दुर्लक्ष झालं असतं. मात्र मी सामाजिक कामं करत राहिलो. बारामती अॅग्रोचं काम पाहिलं. व्यावसायाचा पाया पक्का केला. त्यानंतर रोहित पवारांना हा पक्का केलेला पाया मी दिला”, असंही राजेंद्र पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-निलेश राणेंना पुणे महापालिकेचा दणका, करोडोंची प्रॉपर्टी केली सील; मोठं कारण आलं पुढे
-पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत; १० ते १२ गाड्यांची तोडफोड
-सासवडमध्ये कांद्याच्या शेतात अफूची लागवड; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
-“जबाबदारीच्या पदावर बसलेली लोक पोरकट बोलतात”; शरद पवारांनी शिंदे-फडणवीसांना फटकारलं
-“जरांगेंना शरद पवार, रोहित पवारांकडून मदत मिळते, त्यांचं आंदोलन स्क्रिप्टेड आहे”