पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात आले. राज ठाकरे हे अयोध्येतील वादग्रस्त ढाचा असलेली बाबरी मशीद पाडल्यानंतर तिची वीट राज ठाकरे घेऊन पुण्यात आले. ही वीट काही दिवसांपूर्वी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी त्यांना दिली होती. बाळ नांदगावकर १९९२ मध्ये बाबरी मशीद पडली त्यावेळी अयोध्येला गेले होते. बाळ नांदगावकर यांनी तेव्हापासून ही वीट सांभाळून ठेवली होती. त्यांनी येताना मशिदीची वीट आपल्यासोबत आणली होती. ती वीट त्यांनी राज ठाकरे पुण्यात घेऊन आले. आज त्यांनी ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’ला भेट दिली.
‘वर्तमानात कसं जगावं, आणि भविष्यात कसं जगावं हे इतिहास तुम्हाला समजवून सांगत असतो. मागे केलेल्या चूका परत करू नयेत. इतिहासात उभे केलेले आदर्श पुढे न्यावेत, हे समजावं म्हणून इतिहास प्रत्येकाने वाचला पाहिजे. खासकरून महाराष्ट्राचा इतिहास वाचला पाहिजे. महाराष्ट्रात हजारो वर्षांचा इतिहास आहे, बाकीच्यांकडे भूगोल आहे”, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.
“इतिहास का वाचावा तर वर्तमानात कसं जगावं? हे शिकायला मिळाला पाहिजे त्यामुळे वाचला पाहिजे. इतिहासावर संशोधन करणारी ही संस्था आहे. या संस्थेसाठी मला काहीतरी कारवासे वाटते. यामुळे आज मी संस्थेला २५ लाख रुपये देत आहे” असं मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले आहेत.
पुण्यातील इतिहास संशोधक मंडळात राज ठाकरे आले. यावेळी त्यांनी शिवकालीन पत्राची पाहणी केली. त्यानंतर इतिहास संशोधक मंडळाला २५ लाखांची देणगी दिली. त्याचबरोबर बाबरी मशिदीची ती वीटही इतिहास संशोधक मंडळाला दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन; देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी
-“देशाच्या सर्वोच्च नेत्यांना अतिशय खालच्या स्तरावर जाऊन बोलणं हे देखील अत्यंत चुकीचं”
-“तुझ्या बापाने पाहिला का माझ्याबरोबर काँन्ट्रॅक्टर”; शरद पवार गटाच्या शहराध्यक्षावर अजितदादा भडकले
-निखिल वागळेंची गाडी फोडणाऱ्यांवर कारवाई; धीरज घाटेंसह 200 जणांवर गुन्हा दाखल
-“लोकशाही दाबण्यासाठी भाजप गुंडांचा वापर करणार”; रोहित पवारांचे ताशेरे