पुणे : पुण्यासह महाराष्ट्र्रात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. आज पुणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. सलग सुरु असलेल्या पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नका असे आवाहन पुणेकरांना केले आहे.
पावसाने खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पुण्यातील प्रसिद्ध भिडे पूल देखील पाण्याखाली गेला आहे. नदीपात्रातील रस्ते देखील वाहतुकीसाठी बंद असून नदीपात्रातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. पुण्यातील पावसाची स्थिती पाहता पालमंत्र्यांनी महत्वाचे आदेश दिले आहेत.
शहरातील सिंहगड रोडवरील रास्ता परिसर आणि अनेक इमारतींमध्ये पाणी साचले आहे. अनेक नागरिक घरांमध्ये अडकले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वेळ पडल्यास लोकांना हेलिकॉप्टरने वाचवण्याचे आदेश दिले आहेत. पाणी भरल्याने तेथील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. छातीपर्यंत पाणी साचल्याने परिसरातील नागरिकांना बोटींच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वेळ पडल्यास लोकांना हेलिकॉप्टरने वाचवण्यात येईल असे आदेश दिले आहेत.