अहमदनगर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी बारामती लोकसभा मतदार संघातील विरोधी उमेदवार आणि त्यांच्या सूनबाई सुनेत्रा अजित पवार यांच्यावर ‘घरातले पवार आणि बाहेरचे पवार यात फरक असतो’, अशी टीका केली होती. शरद पवारांनी केलेल्या या टीकेला आता भाजप नेते राधा कृष्ण विखे पाटील यांनी भर सभेत समाचार घेतल्याचं पहायला मिळालं आहे.
“बारामती लोकसभा मतदार संघात शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सूनबाई सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्या ४० वर्ष पवारांच्या घरात राहता आहेत पण पवारांना त्यांची किंमत नाही, मग जनतेची किंमत त्यांना कशी राहणार आहे. जनतेला त्यांनी कधीच वाऱ्यावर सोडलं आहे”, अशा शब्दांत राधाकृष्ण विखे पाटीलांनी शरद पवारांवर टीका केली आहे.
“तुम्हाला जनतेचा शाप लागल्याशिवाय राहणार नाही”
“ज्या माणसाला आपल्या घरात ४० वर्ष राहणाऱ्या सुनेची किंमत कळाली नाही, तो जनतेशी काय बांधील राहणार. पवारांनी आयुष्यभर केवळ फोडाफोडीचे राजकारण केले. माणसांवर माणसं घातली. वैयक्तिक द्वेषाच राजकारण ते करतात. द्वेष, मत्सर या शिवाय दुसरं राजकारण त्यांनी कधीच केलं नाही. त्यामुळे जनतेचा शाप तुम्हाला या लोकसभा निवडणुकीत मिळाल्या शिवाय राहणार नाही. उरली सुरली राष्ट्रवादी, उरली सुरली शिवसेना (उबाठा) यांना निवडणुकीनंतर जनता घराबाहेर बाड बिस्तार काढून दिल्या शिवाय राहणार नाही”, असा विश्वास राधा कृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘पुण्यकर्माच्या बदल्यात स्वर्गप्राप्ती करुन देतो’ म्हणत भोंदूनी डॉक्टरांना घातला ५ कोटींचा गंडा
-“सून म्हणून माझी निवड शरद पवारांनीच केली”; शरद पवारांच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया