पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून आता ३ वर्षे उलटून गेली. तेव्हापासून ना इकडे ना तिकडे या भूमिकेत असणारे आमदार अशोक पवार यांनी आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिरुरमध्ये जाऊन अशोक पवारांनी डिवचले होते. त्यातच आता घोडगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा झाल्याचे पहायला मिळाले आहे.
घोडगंगा साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा शिरुरमध्ये शुक्रवारी आयोजित करण्यात आली. या सभेत ‘अशोक पवार चोर है’ अशा अशोक पवार यांच्याविरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आल्या. सभा सुरु असताना शेतकऱ्यांनी घातलेल्या या गोंधळामुळे काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी जुन्नर आंबेगावमधील भर सभेत घोडगंगा साखर कारखाना बंद पाडतो. घोडगंगा साखर कारखाना तर बंदच असतो, असे म्हणत अशोक पवारांना डिवचलं होतं. यामुळे आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
-..अन् बघता बघता महापालिकेचा ट्रक गेला थेट खड्ड्यात; नेमका काय प्रकार?
-आयफोन प्रेमींसाठी खूशखबर; आता घरबसल्या अवघ्या १० मिनिटात आयफोन १६ मिळणार हातात, कसा ते वाचा
-शरद पवारांच्या राष्ट्रवादीत इनकमिंग सुरु; ओबीसीच्या ‘या’ बड्या नेत्यांने हाती घेतली ‘तुतारी’
-‘त्या-त्या वेळी मी माझा निर्णय जाहीर करेन’; अजितदादांच्या कट्ट्रर समर्थकांची बंडखोरीची भाषा
-”लाडकी बहिण’साठी शिक्षक, गोरगरीब विद्यार्थ्यांना अर्थिक संकटात टाकलं’; राज्य सरकारवर गंभीर आरोप