पुणे : पुणे शहरामध्ये चोरी, लूट, हत्या, अंमली पदार्थांची खरेदी विक्री, सायबर गुन्हे, दहशत माजवणाऱ्या टोळ्यांचा हैदोस असे प्रकार घडत असून दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अशातच आता शहरातील खुळेवाडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खुळेवाडी येथील एलआयसी मोकळ्या मैदानावर मानवी हाडांचा सापळा आणि कवटी सापडली आहे. या घटनेने परिसराच चांगलीच खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं.
विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हाडे ससून रुग्णालयाच्या माहितीनंतर या हाडांचा उलगडा होईल. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. लोहगावमधील खुळेवाडी मैदानावर एका व्यक्तीचा हाडांचा सापळा पडल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली.
विमानतळ पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर मानवी व्यक्तीची सात प्रकारची हाडे आणि कवटी दिसली. त्या ठिकाणी पोलिसांना मोबाइल फोन आणि ‘शिवकुमार के.’ या नावाचे आधार कार्ड मिळले आहे. पोलिसांनी पंचनामा करून हाडे पुढील तपासासाठी ससून रुग्णालयात पाठवली आहेत. अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, सहायक आयुक्त प्रांजली सोनावणे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-गोरे म्हणाले ‘त्या प्रकरणी माझी निर्दोष मुक्तता’, पीडित महिला म्हणाली, ‘ही केस…’
-स्वारगेट अत्याचार प्रकरण: नराधम दत्ता गाडेच्या चौकशीत धक्कादायक फोटो आले समोर
-धक्कादायक! एक दिवसाच्या बाळाचा मृतदेह कब्रस्तानातून गायब; पुण्यात नेमकं काय घडलं?
-साखरपुडा सुरु असताना पोहचली प्रेयसी, मुलाची नाही तर मुलीची प्रेयसी, अन्… पुढे काय झालं?