पुणे : राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुणे शहरामध्ये १ एप्रिल ते ३ एप्रिल असा ३ दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये उन्हाच्या कडाका चांगला वाढला होता. त्यामुळे पुणेकरांची लाहीलाही झाली होती. आता २ दिवसांपासून ऊन कमी झाल्याचे पहायला मिळाले वातावरण मात्र दमटच आहे. त्यामुळे आता अवकाळी पावसामुळे पुणेकरांना उकाड्यापासून किंचित दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
राज्यातील ८ शहरांना मंगळवार आणि बुधवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यात पुणे घाटमाथ्याचा समावेश आहे. त्यामुळे १ आणि २ एप्रिल रोजी पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पावसामुळे तापमानात २ – ४ अंशांनी घट होऊन पारा २ ते ५ एप्रिलदरम्यान ४० वरून ३६ अंशांवर खाली येईल, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, हिमालयापासून ते पूर्वोत्तर भारत, मध्य भारत, मध्य प्रदेश महाराष्ट्र ते दक्षिण भारत असा संपूर्ण देशात वळवाचा प्रभाव १ ते ४ एप्रिल या कालावधीत राहील. महाराष्ट्रात मात्र १ ते २ एप्रिल हे दोन दिवस सावधानता बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे. कारण या कालावधीत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातील ‘या’ ४ शिलेदारांवर काँग्रेसने सोपवली मोठी जबाबदारी
-दर अमावस्थेला नारळ दही-भात, अंडी ठेवत जादूटोणा करायची; महिलेचा व्हिडीओ व्हायरल
-पुण्यातील डॉक्टरचा प्रताप; पहिलं लग्न लपवलं दुसरंही केलं अन्…