पुणे : ‘जय भवानी जय शिवाजी’ या जयघोषात राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.तर पुणे शहराचा पूर्व भाग म्हणून ओळख असलेल्या सोमवारी पेठेतील विजय मित्र मंडळ ट्रस्ट आणि सम्राट ग्रुपचे मार्गदर्शक, भाजपचे नेते, पुणे महानगरपालिकेतील माजी सभागृह नेते गणेश बिडकर, मार्गदर्शक विशाल दरेकर आणि संस्थापक अध्यक्ष शुभम पवार हे मागील तीन दशकांपासून भव्य दिव्य शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करत आले आहेत. यंदाच्या वर्षी ‘हिरकणी फेम’ सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी शिवजयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाला हजेरी लावून रसिक प्रेक्षकांची मन देखील जिंकली आहेत. या कार्यक्रमादरम्यान मर्दानी खेळाचे आणि सुरेख अशा मल्लखांबाचे प्रात्यक्षिक तरुणांनी करून दाखवले. उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवून जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करत प्रात्यक्षिक करणार्या मुलांचे कौतुक देखील केले.
या कार्यक्रमावेळी गणेश बिडकर म्हणाले, “सोमवार पेठेतील विजय मित्र मंडळ ट्रस्ट आणि सम्राट ग्रुपच्या माध्यमांतून वर्षभर विविध उपक्रम हाती घेण्यात येतात आणि आपण वर्षभर ज्या दिवसाची वाट पाहत असतो, तो दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज जगभरात शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी होत आहे. त्या प्रमाणेच आपल्या पुणे शहरातील पूर्व भाग म्हणून ओळखल्या जाणार्या सोमवारी पेठेत देखील मोठ्या उत्साहाच्या वातावरणात जयंती साजरी केली जात आहे. याबद्दल मला खूप आनंद होत आहे.”
“छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्येक पिढीला प्रेरणा आणि संदेश देण्याचे काम केले आहे. त्यामुळे मी आणि आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेल्या मार्गावर काम करित राहिले पाहिजे.तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संकल्पनेतील जो महाराष्ट्र होता.जे स्वराज्य होत,ते सर्वांनी मिळून आणण्याचा प्रयत्न करावा,तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरकारच्या माध्यमातून तो प्रयत्न करीत असून या कामासाठी चळवळ उभारली गेली पाहिजे”,असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांचा अनोखा ‘The White Lotus’ थीम वाढदिवस सोहळा
-सोशल मीडियावर मैत्री पडली महागात; ६ जणांनी बोलावून घेतलं, त्याचे नग्न व्हिडिओ, फोटो काढले अन्…
-स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलाचे अपहरण करुन मारहाण, नेमकं कारण काय?
-गावातील समलैंगिक संबंध ठरलं त्याच्या शेवटाचं कारण; गोड बोलून भेटायला बोलवलं अन्…
-पोर्शे कार प्रकरणाची सुनावणी लवकरच सुरु होणार; सरकारी वकील कोण असणार?