पुणे : पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाने थैमान घातले असून पुणे जिल्ह्यात असणाऱ्या धरणांमधील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे. मुळशी, खडकवासला, पानशेत धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. पुणे शहरात पुन्हा एकदा पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील सिंहगड रोड परिसरातील अनेक भागात पाणी शिरले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी अचानाक सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे हजारो नागरिकांचे नुकसान झाले आहे. अनेकांच्या किमती वस्तू पाण्यात भिजून नुकसान झाले तर अनेकांच्या गाड्या वाहून गेल्या आहेत. या पूरपरिस्थितीत अनेकांच्या दुचाकी, चारचाकी वाहनांचे नुकसान झाले होते. अनेक वाहने पाण्यात वाहून गेली. या नुकसान भरपाईबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत.
पूर परिस्थितीत वाहनांचे नुकसान मोठे नुकसान झाले, पण कठोर नियमांमुळे नुकसान भरपाई मिळत नाही, असे शिंदेंच्या समजताच मुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना विमा कंपन्यांशी एकत्रितपणे बोलून यावर मार्ग काढण्यास आणि तातडीने वाहनधारकांना नुकसान भरपाई मिळावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-सावधान! पुण्यात पुन्हा पूर; खडकवासला धरण ६५ टक्क्यापर्यंत खाली करण्याचे पालकमंत्र्यांच्या सूचना
-Pune: काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष बदलावरुन वाद; अरविंद शिंदे म्हणाले ‘मी त्यांच्याशी…’
-पुणेकरांनो सावधान! खडकवासल्यातून विसर्ग वाढवला; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
-अन् पुण्यातल्या खड्यांवरून मोहोळ झाले आक्रमक, म्हणाले “कामात हयगय करणारे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना…”