पुणे : महाविकास आघाडीच्या बारामती, शिरुर आणि पुणे लोकसभा निवडणुकीसाठी तिन्हीही उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरुरमधून अमोल कोल्हे आणि पुण्यामधून रवींद्र धंगेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळ महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. सोबतच सभा आयोजित करण्यात आली. या सभेत बोलताना शरद पवारांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे.
“सत्तेचा उन्माद काय असतो, हे राज्यकर्त्यांनी दाखवून दिलं असतं. नरेंद्र मोदी सरकार हे जनतेची फसवणूक करत आहे” असा गंभीर आरोप शरद पवारांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या या सभेला मोठी गर्दी झाली होती. पुण्यातील महाविकास आघाडीचे सगळे स्थानिक नेते उपस्थित होते. शरद पवार उभं राहताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता.
“मोदी २०१४ सत्तेत आले. त्यावेळी पेट्रोलचे भाव ७१ रुपये दिले. मोदी म्हणाले पन्नास दिवसांत पेट्रोलचे भाव कमी आणतो. आज ३ हजार ६५० दिवस झाले, आज दर १०६ रुपये झाले. घरगुती गॅस बाबत मोदी म्हणाले, ४१० रुपयांवरून कमी आणणार. आता १ हजार १६० रुपये झाला” असं शरद पवार म्हणाले.
“मोदी तरुण मुलांना रोजगार देणार होते. प्रत्येक वर्षी २ लाख रोजगार देणार होते, उलट रोजगार टक्का घसरला. आज ८६ टक्के तरुण बेरोजगार आहेत. याचा अर्थ शब्द द्यायचा आणि तो फिरवायचा. त्यामुळं जनतेने आता मोदींच्या हातात सत्ता द्यायची नाही, हा ठाम निर्णय आम्ही घेतला” असं शरद पवार म्हणाले आहेत.
“आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी गेली १० वर्षे जनतेची फसवणूक केली. महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, महिलांची सुरक्षितता याबाबत केलेली वक्तव्य आणि वस्तुस्थिती यात जमीन-अस्मानचा फरक आहे”, असं म्हणत शरद पवारांनी थेट विरोधकांवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Shirur Lok Sabha | “तुमच्यामुळे मी तिनदा खासदार झालो, ही माझी शेवटची निवडणूक”- आढळराव पाटील
-“बारामती एक विकासाचं मॉडेल, हा विकास फक्त अजितदादांमुळेच”- सुनेत्रा पवार
-भोरमध्ये सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का, ठाकरे गटाचा नेता थेट पोहचला अजितदादांच्या स्टेजवर
-Shirur Lok Sabha | शिरुरमध्ये ‘महागद्दार’वरुन दिलीप मोहिते अन् अमोल कोल्हेंच्यात चांगलीच जुंपली