पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काढलेल्या शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी स्वाभिमाना शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात जंग छेडली आहे. रविकांत तुपकर यांनी शेतकरी संघटनेची हानी केल्यामुळे त्यांची हकालपट्टी केल्याचे संघटनेकडून सांगितले जात आहे. मात्र, आता रविकांत तुपकर यांनी पुण्यात महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीची घोषणा केली आहे.
परवा जो धक्कादायक निर्णय स्वाभिमानीने माझ्याबाबत घेतला, संघटनेपासून मला वेगळं केलं, राजू शेट्टी यांची जी भूमिका होती ती ऐकून मला धक्का बसला. आज ४ तास आम्ही चर्चा केली आणि काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. अनेक वेळा मी जेलमध्ये गेलो, शेकडो पोलीस केस अंगावर घेतल्या, लाठ्या-काठ्या खाल्ल्या. २००७ मध्ये आम्ही राजू शेट्टी यांच्यासोबत आलो तेव्हा संघटना कोल्हापूरपर्यंत मर्यादित होती. आज संघटना नावारूपाला आली आणि माझी गरज संपली, अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी दिली आहे.
आगामी विधानसभेच्या निवडणुकीत रविकांत तुपकर हे २५ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. पुण्यातील कार्यकर्ता बैठकीत रविकांत तुपकरांनी ही महत्वाची घोषणा केली आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात ६ जागा लढवणार आहेत. तर लवकरच राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करणार असल्याचे सांगितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘स्मार्ट सिटी’ म्हणवणाऱ्या पुण्याचा विकास पूरात; एकाच पावसात झाली दुर्दशा
-Pune Rain: पुणेकरांना काहीसा दिलासा; पाऊस थांबला पण वीज अद्यापही गुल
-पुण्यातील हजारो नागरिकांचा संसार पाण्यात; अजित पवारांनी दिलं ‘हे’ आश्वासन
-पुण्यात पूरस्थिती! मोहोळ अधिवेशन सोडत थेट पुण्यात पोहचणार; जागेवर जाऊन करणार पाहणी