पुणे : परदेशी नागरिक हे भारतात विशेषत: महाराष्ट्रामध्ये आपल्या भूमीचा इतिहास, सांस्कृती जाणून घेण्यासाठी शिकण्यासाठी नेहमी येत असतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा ही साता समुद्रापार पोहचलेली आहे. याच महाराजांच्या किर्तीची, शौर्याची भुरळ पडलेल्या एका परदेशी पाहुण्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याचे पराक्रमाचे कौशल्य पाहुण्यासाठी सिंहगडावर आलेल्या अशाच एका परदेशी तरुणाला महाराष्ट्रातल्या तरुणांच्या टोळक्याने शिवीगाळ करायला लावत मराठी अस्मितेला कंलक लावल्याचे समोर आले आहे.
न्यूझीलंडमधील एक परदेशी पाहुणा पुण्यातील सिंहगड किल्ला सर करण्यासाठी आलेल्या पर्यटकाला महाराष्ट्रातील काही तरुण भेटले. अर्थात परदेशी तरुणाला भारतीय भाषा येत नसल्यामुळे त्याची खिल्ली उडवण्याच्या हेतून तरुणांनी त्याला अश्लील शिव्या शिकवल्या. समोर जो कोणी दिसेल त्यांना हे बोलायचं, असं सांगितलं. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर आता सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. देशाचा, महाराष्ट्राचे सौंदर्य, शोर्याचा ठेवा हा अभिमानाने पर्यटकांना सांगायचा की शिव्या शिकवायच्या? असा संतप्त सवाल करत व्हिडीओवर प्रतिक्रिया येत आहेत.
माझी महाराष्ट्र पोलिसांना विनंती आहे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहगड किल्ल्यावर आलेल्या परदेशी पर्यटकांसोबत टवाळखोर अवलादीच्या लोकांनी जे कृत्य केले आहे त्याचा या लोकांना असा धडा शिकवा की यांना यांचे बापच नाही यांचे आजोबा पंजोबा आठवले पाहिजेत
😡😡😡@CMOMaharashtra pic.twitter.com/vjHzk8Tt0w— दत्ता चौधरी (@DattaChoud73764) April 11, 2025
एवढं होऊनही समोरुन येणाऱ्या मुलांना या पर्यटकाने तशाच शिव्या दिल्या. पण मुलांच्या वागण्यावरुन त्याच्या हे लक्षात आलं की आपण काहीतरी चुकीचे शब्द उच्चारत आहोत. त्यामुळे या परदेशी पाहुण्याने सर्वांना बाय म्हणत तिथून पुढे गेला. हा सर्व प्रकार त्याने शूट केलेल्या व्हिडीओमध्ये पहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला सर करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकाला शिव्या शिकवल्याने आपल्या संस्कृतीला डाग लागल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. पर्यटकांना शिव्या शिकवणाऱ्या या तरुणांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
-कुख्यात गुंड निल्या घायवळला पैलवानाने भर मैदानात लगावली कानशिलात; नेमकं कारण काय?
-हद्द झाली! वासनांध नराधमाचा कुत्रीवर अत्याचार, पुण्यात नेमकं घडतंय काय?
-पुणेकरांसाठी खुशखबर! यंदा उन्हाळ्यात पाणी कपातीची चिंता मिटली
-‘मी फक्त सरकामधील घटक पक्षाचा आमदार, त्यामुळे…’; छगन भुजबळांनी पुन्हा एकदा ‘ती’ सल बोलून दाखवली