पुणे : पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बाजीराव रोडवरील ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये तब्बल १११ वर्ष जुनी सोन्याची दत्त महाराजांची मूर्ती आहे. ही मुर्ती पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी आता बँकेतच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. १११ वर्षांपूर्वी कोलकातावरून आलेल्या एका भक्ताने पुण्यातील श्री समर्थ नारायण महाराज या ट्रस्टला ही सोन्याची मूर्ती भेट म्हणून दिली आहे.
श्री. सद्गुरु ट्रस्टने ही मूर्ती बाहेर असुरक्षित असल्याच्या कारणाने गेल्या ६० वर्षांपासून बँक ऑफ महाराष्ट्राच्या लॉकरमध्ये ही मुर्ती ठेवली आहे. दत्त जयंतीच्या निमित्ताने ही मुर्ती बाहेर काढण्यात आली असून भाविकांनी मूर्ती पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र बाजीराव रोड शाखेमध्ये ठेवण्यात आली. ही १११ वर्षे जुनी मुर्ती साधारण ३ किलो ५०० ग्रॅम वजनाची आहे. सध्याच्या सोन्याच्या दरानुसार या मुर्तीची किंमत तब्बल २ कोटी ८० लाख रुपयांपर्यंत आहे.
सोन्याच्या या मुर्तीचे संरक्षण ही मोठी जबाबदारी असल्यामुळे श्री. सद्गुरु नारायण महाराज दत्त संस्थान ट्रस्टने ही सोन्याची दत्त महाराज मुर्ती बँक ऑफ महाराष्ट्र बाजीराव रोड शाखेच्या लॉकरमध्ये ठेवली आहे. गेली ६० वर्षे ही मुर्ती बँकेच्या लॉकरमध्ये आहे. दत्त जयंतीच्या मुहूर्तावर या मुर्तीला बाहेर काढण्यात येते. एका विशेष जागी ही मुर्ती काही काळासाठी ठेवली जाते. तसेच या सुंदर दत्ताच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. इतर वेळेस बँकेत लोकांची गर्दी त्यांच्या व्यवहार किंवा पैसे काढण्यासाठी असते. मात्र, आजची ही गर्दी फक्त दत्त महाराजांच्या दर्शनासाठी होती.
महत्वाच्या बातम्या-
-महापालिका निवडणूक कधी होणार? इच्छुकांचे जीव टांगणीला, पडद्यामागे काय घडतंय?
-काका-पुतणे एकत्र येण्यासाठी पवार कुटुंबीय सरसावले, रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य
-‘मी नगरसेवक बोलतोय, तू फक्त येस ऑर नो सांग’; पुण्यात धक्कादायक प्रकार
-Pune: नदीपात्रातील ‘तो’ पूल पाडण्याचा पालिकेचा विचार; नेमकं कारण काय?
-“फडणवीस मुख्यमंत्री होताच राज्यात जातीय तणाव निर्माण करण्याचं षडयंत्र” माजी खासदाराचा गंभीर आरोप