पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील रत्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याचे चित्र आहे. या रस्त्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार सुप्रिया सुळे यांनी सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत भर उन्हातही उपोषण केले. संध्याकाळी ५ नंतर सुप्रिया सुळेंच्या उपोषण मागे घेण्यात आले आहे. यावरुन उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
‘आज लोकप्रतिनिधींनी ज्या रस्त्यासाठी आंदोलन केले, त्या रस्त्यासंबंधीचा प्रश्न राष्ट्रवादीच्या बैठकीत कालच चर्चिला गेला. भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी रस्त्याबाबतचा आग्रही मुद्दा मांडला. मी देखील त्यावर सकारात्मक होतो, लगोलग आदेशही दिले आहेत. काम लगेच चालू होईल. २ तारखेची वाट बघणार नाही. आमदार शंकर मांडेकर यांनी बनेश्वरच्या रस्त्याचा प्रश्न मांडला आहे. मी इथला पालकमंत्री आहे. रस्ता सहाशे मीटरचा आहे, फार मोठा नाही. हा रस्ता पीएमआरडीए, जिल्हा परिषद किंवा जिल्हा वार्षिकी योजनेमधून तो रस्ता करण्यात येणार आहे”, असे अजित पवार म्हणाले. त्यानंतर सुप्रिया सुळेंची ही स्टंटबाजी आहे का? याबाबत विचारले असता अजित पवार यांनी ‘नो कॉमेंट्स’ म्हणत ‘केवळ सहाशे खासदारांना ५ कोटींचा निधी मिळतो. रस्ता करायचा म्हटले तर या निधीतून करता येतो. त्या एका मिनिटात रस्ता करण्यासंबंधी निर्णय घेऊ शकतात’, असा टोलाही अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना लगावला आहे.
‘हा रस्ता अवघा ६०० मीटरचा आहे आणि रस्ता व्हावा ही इच्छाच असेल तर खासदार निधीतून तो रस्ता करता येऊ शकतो. मी गेली ३५ वर्षे राजकारण करतोय. पण ६०० मीटरच्या रस्त्यासाठी खासदारांचे उपोषण…?आमदार आणि खासदारांना दरवर्षी ५ कोटींचा विकासनिधी मिळतो. ५०-६० लाख रस्त्याला लागले असते. जर रस्ता व्हावा ही इच्छाच असती तर त्यांनाही करता आला असता’, असे अजित पवार म्हणाले आहेत.
सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर?
आज बारामतीत सुप्रिया सुळे अजित पवारांच्या या वक्तव्यावर बोलताना म्हणाल्या, “त्यांचं म्हणणं योग्य आहे. आमदाराला पाच कोटी आणि खासदाराला पण पाच कोटी. आमदाराचे साडेतीन ते चार लाख मतदार असतात एका खासदाराला २३ लाख मतदार असतात. सत्तेतल्या आणि विरोधातल्या कोणत्याच खासदाराला निधी पुरत नाही”, असं सुळेंनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ठाकरे सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; शहरप्रमुख म्हणाले, ‘राजीनाम्याचे पत्रच फेक’
-‘त्या’ रस्त्याच्या कामासाठी सुप्रिया सुळेंचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन
-टेस्ट ट्यूब ट्रीटमेंटने जुळी मुलं झाली, पण बाळांचे वजन वाढेना; आईने उचलेले धक्कादायक पाऊल
-पुण्यात ठाकरेंना मोठा धक्का; महिला आघाडीने दिले धडाधड राजीनामे