पुणे : काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. या स्पर्धेत शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अंतिम सामना झाला होता. या अंतिम लढतीमध्ये पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केले आहे. या लढतीवर सर्व स्तरातून आक्षेप घेण्यात आला या अंतिम सामन्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. पंचाच्या या निर्णयावर आक्षेप घेत शिवराज राक्षेनं विचारणा केली, त्यावेळी राग अनावर झाल्याने त्याने थेट पंचाची कॉलर पकडून लाथ मारली. शिवराजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये तुफान व्हायरल झाला.
राजकीय नेत्यांच्या उपस्थित पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवर महाराष्ट्रभरातून शंका उपस्थित झाली. त्यामुळे या संघटने तसेच महाराष्ट्र केसरी कुस्ती परिषदेची मोठी बदनामी झाले आहे. तर, काहींनी ही कुस्ती पुन्हा घेण्याची मागणीही केली होती. अखेर, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील अंतिम लढतीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
या स्पर्धेत पंचानी दिलेल्या निकालाची चौकशी करण्यासाठी कुस्ती क्षेत्राशी संबंधित ५ जणांची चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. विलास कथुरे यांना या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. तर या समितीने २८ फेब्रुवारीपर्यंत शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात रंगलेल्या अंतिम लढतीसंदर्भात अहवाल देण्याच्या सूचनाही महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून करण्यात आल्या आहेत. त्यामुळे, या कुस्तीचा अंतिम निकाल आता समितीचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. दरम्यान, विलास कथुरे हे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अजितदादांच्या ‘गुगली’ने मनसे नेत्याची दांडी! थेट म्हणाले “तुझ्या नेत्याला सांग..”
-ठाकरेंसाठी घेतला उदय सामतांशी पंगा, आता शिंदेसेनेत प्रवेशासाठी धडपड सुरू
-‘कॉमेडी शो’च्या नावाखाली अश्लिल भाषा; समय रैनाचा उठला बाजार, नेमकं घडलं काय?
-‘व्हॅलेंटाईन डे’ला चढली झिंग, पुण्यात महिलेचा दारु पिऊन तमाशा; भर रस्त्यात बसली अन्…