पुणे : विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर म्हणून पुणे शहराची ओळख आहे. याच पुणे शहरामध्ये बुधवार पेठेमध्ये मोठा वेश्या व्यावसाय सुरु असतो. अनेकदा देशाच्या कानाकोपऱ्यातून महिला, मुलींची देहविक्रीच्या व्यावसायासाठी विक्री केली जाते. अशातच आता धक्कादायक घटना समोर आली आहे. मूळच्या आसाममधील एका विवाहित महिलेला तिच्या प्रियकराने तिच्या ६ वर्षांच्या मुलीसह पुण्याच्या कुंटनखान्यात ५ लाख रुपयांना विकल्याचा प्रकार समोर आला आहे.
मूळची आसाममधील विवाहित महिला हिला तिच्या प्रियकराने लग्नाचे वचन देत पुण्यात आणले. प्रेमात बुडालेल्या महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवत ही महिलाही तिच्या ६ वर्षांच्या मुलीला घेऊन त्याच्यासोबत पुण्यात यायला तयार झाली. पुण्यात आल्यानंतर तिला आणि तिच्या ६ वर्षांच्या मुलीला या नराधमाने ५ लाख रुपयांमध्ये विकल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आता फरासखाना पोलिस ठाण्यात प्रियकर शफीकल आबूल नासूर याहीद आलम (रा. आसाम), कुंटनखाना चालक पापा शेख, अधुग शिवा कामली (दोघे रा. बुधवार पेठ) आणि पोलिस दलातील अनोळखी व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी २५ वर्षीय पोडितेने तक्रार दिली आहे. हा प्रकार एक जानेवारी २०२५ या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शफोऊल मूळचा आसाममधील आहे. पीडित तरुणी विवाहित असून, तिला एक मुलगी आहे. तिचा पती भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. त्याला दारू आणि जुगाराचे व्यसन असून तो तिला त्रास द्यायचा. याचाच गैरफायदा घेत शफीऊलने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले त्याने तिला विवाहाचे आमिष दाखविले. तसेच पुण्यात कामाला लावतो असे सांगितले जानेवारी महिन्यात आसाममधून विमानाने पुण्यात आणले त्यानंतर बुधवार पेठेतील कुंटणखाना चालक पापा शेख याला ५ लाख रुपयात विकले, तरुणीला धमकावून दलाल पापा शेख, अधुरा कामली यांनी वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले.
आरोपींच्या ओळखीतील एका पोलिसाने तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार केले. गेले चार महिने हा प्रकार सुरू होता. दरम्यान, तरुणी कामानिमित्त बाहेर पडली होती. बुधवार पेठेत तिची एका सामाजिक कार्यकत्यांची भेट इाली. तिने तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाची माहिती त्याला दिली. समाजिक कार्यकत्यांने या प्रकाराला वाचा फोडली आणि हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
-“पाकिस्तानचं पाणी बंद केलंच नाही, सरकार खोटं बोलतंय”; प्रकाश आंबेडकरांचं दाखवलं ‘ते’ पत्र
-परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांची चिंता मिटली; प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचा प्रश्न मार्गी
-महाराष्ट्रात ५ हजार पाकिस्तानी; मुख्यमंत्र्यांच्या नागपूरात सर्वाधिक संख्या, पुण्यात किती?