पुणे : पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपूर्वी कल्याणीनगर भागात एका बड्या बापाच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत अलिशान कारच्या भरधाव वेगाने दुचाकीस्वार २ तरुणांना चिरडलं. त्या अपघातात दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण राज्यासह देशभरातून संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर पुण्यात आणखी एका बड्या बापाच्या लेकाचा उन्मादपणा पहायला मिळाला आहे.
रस्त्याच्या मधोमध एक अलिशान कार बीएमडब्लू उभी करत दारुच्या नशेत तरूणांनी अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना घडली समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेला हा तरुण अश्लील चाळे करताना दिसून आला. त्याने सिग्नलवरती रस्त्याच्या मधोमध आपली कार उभी केली, गाडीचा दरवाजा उघडाच ठेवत रस्त्यावर लघुशंका केली आणि रस्त्याने जाणाऱ्यांनी हटकले तेव्हा त्याने पुन्हा एकदा अश्लील चाळे केल्याचे पहायला मिळाले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पहा व्हिडीओ
View this post on Instagram
दरम्यान, येरवडा भागातील पुणे-नगर रोडवरील शास्त्रीनगर चौकात सिग्नलवर भर रस्त्यात गाडी उभी करुन या तरुणाने अश्लील चाळे केले. MH-12 RF8419 असा या बीएमडब्लू कारचा नंबर असून यामध्ये आणखी एक जण बसलेला होता. दोघेही प्रचंड दारुच्या नशेत होते. त्यांना धड चालताही येत नव्हतं. चौकात अश्लील चाळे करुन झाल्यावर दोघे भरधार वेगाने गाडी चालवत वाघोलीच्या दिशेने गेल्याचे पहायला मिळत आहे. सकाळच्या सुमारास तरुणाने सिग्नलवर या तरुणाचा धिंगाणा पहायला मिळाला. त्यामुळे पुणेकरांकडून संतप्त प्रतिक्रया उमटत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-स्वारगेट अत्याचार: ‘माझ्या बदनामीला जबाबदार कोण?’ पीडितेच्या प्रश्नावर पोलीस काय म्हणाले?
-पुण्याला मिळणार आणखी एक आमदार; मानकर अन् मुळीकांच्या नावाची जोरदार चर्चा
-‘रावण रेपिस्ट पण त्याने कधीही परस्त्रीला हातही…’; जया किशोरींच्या वक्तव्याने खळबळ
-रात्री बाराचा ठोका अन् गुन्हेगारांनी केलं पोलिसांचं बर्थ-डे सेलिब्रेशन; बीडलाही टाकलं मागं