पुणे : पुणे कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्शे अपघात प्रकरणाची देशभर चर्चा झाली. या पोर्शे अपघात प्रकरणी मुख्य आरोपीसह दोषी आढळलेल्या अनेकांवर कारवाई करण्यात आली. अशातच आता या प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. या कार अपघात प्रकरणात दोषी आढळल्याने पुणे पोलीस दलातील २ पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते आता या पोलीस अधिकाऱ्यांचे पोलीस सेवेतूनच बडतर्फ करण्याची शक्यता आहे.
अपघात प्रकरणात दोषी आढळलेल्या या दोन अधिकाऱ्यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी ‘पोलीस महासंचालक’ कार्यालयाकडे पाठवला असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
दरम्यान, पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचे आई-वडील, ससूनचे दोन डॉक्टर यांच्यासह १० जणांना अटक करण्यात आली. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा पुणे पोलिसांचा प्रयत्न आहे. पोर्शे अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाने दुचाकीवरून चाललेल्या तरूण आणि तरूणीला धडक दिली होती. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. यामध्ये मुख्य आरोपी हा अल्पवयीन असून प्रसिद्ध बिल्डर विशाल आग्रवालचा मुलगा आहे.
अल्पवयीन आरोपीला शिक्षा म्हणून निबंध लिहण्याचे न्यायालयाने आदेश दिले होते. न्यायालयाच्या या निर्णयावर पुणेकरांसह राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणात कारवाई केली होती. बड्या बापाच्या मुलाला शिक्षा मिळाली होती. आता हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात कधी पोहचणार? आरोपींवर कारवाई कधी होणार? याचीच सर्वांना प्रतिक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या-
-थायलंडमध्ये अपघात झालेल्या दाम्पत्याला मायदेशी आणण्यात यश; मुरलीधर मोहोळांची संवेदनशीलता
-वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचा वाद पेटला? भूषणसिंहराजे होळकर काय म्हणाले? पहा व्हिडीओ
-Pune: भररस्त्यात लघुशंका, अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर
-ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणला अन् पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला