पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी केवळ महायुतीच्यावतीने बनसोडे यांचा अर्ज आला होता. आज दुपारी अर्ज पडताळणीत वैध ठरला आहे. उद्या बुधवारी सभागृहात विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी अण्णा बनसोडे यांच्या नियुक्तीची घोषणा अध्यक्षांकडून घोषणा केली जाणार आहे. विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी तीन नावे चर्चेत होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या ३ आमदरांची नावे चर्चेत होती. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांचे नाव चर्चेत होते. तसेच लातूरचे आमदार आणि माजी मंत्री संजय बनसोडे, अर्जुनी मोरगावचे राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले या तिघांची नावे चर्चेत होती. आज अखेर अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.
विधानसभा उपाध्यक्षपदासाठी उद्या, २६ मार्च २०२५ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून महायुतीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरीचे आमदार श्री. अण्णा बनसोडे यांनी आपला अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमवेत उपस्थित… pic.twitter.com/OuMiu5cUuK
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 25, 2025
दरम्यान, स्थापनेपासून मंत्रिपदाची प्रतिक्षेत असणाऱ्या पिंपरी- चिंचवड शहराला मंत्रिपदाचा दर्जा असलेले विधानसभेचे उपाध्यक्षपद मिळणार आहे. अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय असणारे आण्णा बनसोडे यांनी महापालिकेत तीन टर्म नगरसेवक होते. त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे. २०१४ चा अपवाद वगळता पिंपरी मतदारसंघाच्या निर्मितीपासून ते विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. अण्णा बनसोडे यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून येण्याचा विक्रम केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-संतापजनक! चौथीत शिकत असणाऱ्या चिमुरडीला खाऊ देतो म्हणत बोलवून घेतलं अन्…
-Big News : छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगणामधून अटक!
-स्वारगेट अत्याचार प्रकरणी महत्वाची अपडेट; एसटी महामंडळानं ‘त्या’ ७ बड्या अधिकाऱ्यांची केली बदली