पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर अनेकांच्या पुणे शहरात सभा, प्रचार, रॅली आयोजित होते. त्यातच आज पुणे शहरात जोरदार पाऊस पडला आणि पुण्यात अचानक झालेल्या पावसामुले राजकीय नेत्यांच्या प्रचारावर चांगलाच परिणाम झाल्याचे पहायला मिळाले. पुण्यातील हडपसर परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भर पावसात रोड शो केला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आढळराव पाटलांच्या प्रचारासाठी रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. मात्र रोड शो सुरु असताना मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
“आम्ही शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलो आहोत. पावसात आम्हाला भिजायची सवय आहे. त्यामुळे पावसात रोड शो करण्याचे फार विशेष नाही. लोकांना आमच्याबद्दल विश्वास वाटतो, त्यामुळे पावसात एवढे लोक रोड शोला आले आहेत”, असे अजित पवार म्हणाले आहेत. पुणे शहरातील कोंढवा, लुल्लानगर, साळुंखे विहार, कौसरबाग, कात्रज गावठाण, कात्रद चौक, सुखसागर नगर, कोंढवा बुद्रुक नगर, गोखलेनगरसह अनेक परिसरात अजित पवारांचा रोड शो झाला. यावेळी रोड शोला विविध परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळाले.
कोंडवा, पुणे
महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांची कोंडव्यामध्ये भर पावसात भव्य बाईक रॅली..! pic.twitter.com/KF4YISTjtv— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 10, 2024
अजित पवारांनी शिवाजी आढळराव पाटलांना यांना मोठे मताधिक्य देण्याचे आवाहन केले आहे. आमदार चेतन तुपे, योगेश टिळेकर, नाना भानगिरे, साईनाथ बाबर यांनी मतदार संघातून मोठे लीड देण्याचे भाष्य केले. घड्याळाला मतदान करुन आढळराव पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा. असे आवाहन यावेळी सर्वांनी केले. हडपसर भागातील महायुतीमधील सर्वं सभासद हे रॅलीला उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-“भविष्यात लढेल की नाही माहीत नाही….” आढळराव पाटील झाले भावूक
-‘तुम्हाला लाज कशी वाटत नाही ठाकरे’; केतकी चितळे ठाकरेंवर का भडकली?
-Pune | पुण्यात जोरदार पाऊस; राज ठाकरेंची सभा होणार रद्द?
-‘वेळीच सुधारा अन्यथा त्यांचे कामच करून टाकीन’; अजित पवार कोणाला दिला इशारा?
-पाच वर्ष मतदारसंघात फिरकले नाहीत, आता कोल्हे म्हणतात, “अभिनयातून ब्रेक घेतो पण…”