पुणे : शहरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच आता शहरातील धक्कादायक बाब समोर आली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या शनिवारवाड्यात एक बेवारस पिशवी आढळून आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारवाडा परिसराची बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे.
शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळली या बातमीने एकच खळबळ उडाली होती. अशी बेवारस कोणतीही बेवारस बॅग आढळली नाही तसंच फोन करणारा अज्ञात व्यक्तीही गायब झाला आहे, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. फोन करणाऱ्या अज्ञातामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. खबरदारी म्हणून बीडीडीएस पथकाकडून अजूनही तपास सुरुच आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कालिचरण महाराजांना ‘ते’ वक्तव्य पडणार महागात; राज्य महिला आयोगाचं नाशिक पोलिसांना पत्र
-एकच लक्ष्य ६५ हजार वृक्ष! चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प
-प्रांताधिकार्याचे आरोप, जिल्हाधिकारी दिवसेंनी सांगितलं सत्य; नेमकं प्रकरण काय?