पुणे : वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे नागरिकांना वाहनांच्या कोंडीला सामोरं जाव लागत आहेत. त्यातच पुणे शहरात तर वाहतूक कोंडी अधिक प्रमाणात होत असल्याचं पहायला मिळत आहे. पुण्यातील वाहतूक व्यवस्थेचा फज्जा उडाल्याचा दावा करणाऱ्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने बुधवारी दखल घेतली आहे.
वाहतुकीच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे वाहतूक समस्या निर्माण होत आहे. परिणामी त्वेषाने वाहन (रोड रेज) चालवण्याच्या घटनांही वाढत असल्याची टीका करून उच्च न्यायालयाने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे, स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्थेबाबतचा फेरआढावा घेण्याचे आणि त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पुणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत.
पुणे पोलीस आयुक्तांनी अहवाल सादर केल्यानंतर त्यातील निष्कर्षांच्या आधारे, सध्याच्या वाहतूक समस्येवर उपाय सुचवण्यासाठी आणि वाहतूक विभागाला अधिक चांगल्या प्रकारे सुसज्ज करण्याच्या दृष्टीने उपायोयजना करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल, असेही मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-..म्हणून देवेंद्र फडणवीस परत एकदा म्हणाले, “मी पुन्हा येईन”
-महायुतीच्या जागा वाटपाआधी राजकारणात मोठ्या हालचाली; आढळराव पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?
-अजितदादांच्या धाकट्या चिरंजीवांचा जंगी बर्थडे, म्हणाले “आधी बारामती उरकतो मग पुण्यातच आहे”
-पुण्यात गाडी तोडफोड सुरुच; येरवड्यात कोयता गँग नंतर आता कोंढव्यात दारूच्या नशेत ८ गाड्या फोडल्या
-निलेश राणेंना पुणे पालिकेचा दिसाला; कमीचा धनादेश स्वीकारत थकबाकी केली शून्य