पुणे : पुणे शहरामध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते. पुणेकरांना या वाहतूक कोंडींचा सामना करावा लागतो. पुणे तिथं काय उणे! ही म्हण अनेकदा खरी ठरत असून वाहतूक कोंडीच्या बाबतही ही म्हण आणखी एकदा खरी ठरली आहे. कारण पुणेकरनांनी आता वाहतूक कोंडीच्या बाबतीतही महाराष्ट्रात पहिला, तर जगात चौथा क्रमांक पटकावला आहे. ‘टॉमटॉम ट्रॉफक इंडेक्स’ रिपोर्टनुसार, भारतातील ३ शहरांचा समावेश आहे. जागतिक क्रमवारी पहिल्या क्रमांकावर पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता असून, तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटकची राजधानी बंगळुरू आहे. चौथ्या क्रमांकावर पुणे शहर असल्याची माहिती आहे.
डच लोकेशन टेक्नोलॉजी फर्म, टॉमटॉमच्या ट्रॅफिक इंडेक्स रिपोर्टनुसार, भारतातील ३ शहरांमध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडी होते. यामध्ये कोलकाता, बंगळुरू आणि पुणे शहरांचा समावेश आहे. कोलकाता आणि बंगळुरूमध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडीची नोंद झाली असून, त्यानंतर चौथ्या क्रमांकावर पुणे शहर असल्याची माहिती आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये १० किलोमीटर अंतर गाठण्यासाठी २९ मिनिटे लागत असल्याची माहिती समोर आली आहे. तर पुण्यामध्ये १० किमी अंतर पार करण्यासाठी किमान ३३ मिनटे २२ सेकंद लागतात. जागतिक क्रमावारीमध्ये वाहतूक कोंडीच्या बाबतीत पुणे शहर चौथ्या क्रमांवर आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषद; अन् ५ मिनटापूर्वीच आला ‘तो’ फोन
-धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रश्न विचारताच अजितदादा भडकले, म्हणाले,…
-‘एका जत्रेनं देव म्हातारा होत नाही’; शरद पवारांच्या खासदाराला मोरेंनी सुनावलं