पुणे : रमजान ईदनिमित्त शहरातील गोळीबार मैदान चौकातील ईदगाह मैदानावर नमाज पठण होणार असून नमाज पठणासाठी मुस्लिम बांधवाची गर्दी होणार आहे. चंद्रदर्शन रविवारी (३० मार्च) सायंकाळी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सोमवारी (३१ मार्च) रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर या भागाताील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.
‘लष्कर भागातील गोळीबार मैदान चौकातील ईदगाह मैदान येथे सोमवारी सकाळी सामुदायिक नमाज पठण होणार असून सोमवारी सकाळी साडेसहा ते साडे अकरापर्यंत या भागातीला वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा’, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
वाहतूकीचे बदल कसे असणार?
सोलापूर रस्त्यावरील भैरोबानाला चौक ते गोळीबार मैदान चौक दरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. सोलापूर रस्त्याने स्वारगेटकडे जाणारी जड वाहने भैरोबानाला चौकातून डावीकडे वळून प्रिन्स ऑफ वेल्स रस्तामार्गे लुल्लानगर येथून इच्छितस्थळी जातील. पुणे स्टेशन, तसेच शहरात जाणाऱ्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. हलकी वाहने एम्प्रेस गार्डनमार्गे इच्छितस्थळी जातील. स्वारगेटकडून गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहने सेव्हन लव्हज चौकातून (ढोले पाटील) चौकातून उजवीकडे वळून सॅलिसबरी पार्कमार्गे खटाव बंगला येथून उजवीकडे वळून लुल्लानगर किंवा सोलापूर रस्त्याकडे जातील.
सोलापूर बाजार चौकी ते गोळीबार मैदान चौक दरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी लष्कर भागातील खाणे मारुती चौक, पूलगेट स्थानकमार्गे सोलापूर बाजार चौक, नेपीयर रस्ता, खटाव बंगला चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. लुल्लानगर चौकातून गोळीबार मैदान चौकाकडे येणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मुंडेंनी मुलांचा स्विकार केला पत्नीचा का नाही?, तृप्ती देसाईंचा आक्रमक सवाल
-आमदार झाल्यानंतर पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात हेमंत रासनेंची प्रभावी कामगिरी
-आपलं नपुंसकत्व लपवण्यासाठी मित्रालाच आणलं घरी अन्…. पुण्यातील धक्कादायक प्रकार
-मुख्यमंत्री अन् सरकार काय बोळ्याने दूध पितात का? अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण?; उदयनराजे आक्रमक
-‘असा चमत्कार झाला तरच नमस्कार होणार’; विजय शिवतारेंनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान