पुणे : वाढत्या शहरीकरणामुळे पुणे शहरात वाहतूक कोंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात वाहतूक कोंडी झाली असली तरी नियम मोडणाऱ्यांचीही काही कमी नाहीये. अशातच आता एका तरुणाला नियमभंग करणं चांगलंच महागात पडलं आहे. मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्या रब्बीन शेख (वय २९) याला दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली आहे. या दुचाकीस्वाराला प्रथमवर्ग न्यायदंधिकारी अमृत बिराजदार यांनी ५दिवसांचा साधा कारावास आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
कोथरूड वाहतूक शाखेतील पाेलीस कर्मचारी ३ ऑगस्ट २०२४ रोजी पौड फाटा येथे नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी करत होते. मध्यरात्री दीडच्या सुमारास दुचाकीस्वार रब्बीन शेख भरधाव वेगाने निघाला होता. नाकाबंदीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला अडवले. तपासणीत त्याने मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडे वाहन परवाना नसल्याचे देखील समोर आल्यानंतर त्याच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्यातील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील वर्षाराणी जाधव यांनी बाजू मांडली आहे.
दरम्यान, रब्बीन शेख याने वाहन परवाना नसताना दारूच्या नशेत धोकादायक पद्धतीने दुचाकी चालविली, असे सरकारी वकील वर्षाराणी जाधव यांनी युक्तिवादात नमूद केले. आरोपीचे वय आणि पहिलाच गुन्हा असल्याने न्यायालयाने भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम २८५ (२) नुसार शिक्षा सुनावली. आरोपीने दंड न भरल्यास २० दिवसांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने निकालपत्रात सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे विमानतळावर ‘डिजियात्रे’चा मोहोळांकडून शुभारंभ; मात्र इतर ३३ विमानतळांबाबत दिली ‘ही’ कबुली
-Pune: महापालिका निवडणुकीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्वाची माहिती
-“दादा बोलले असतील तर फायनल…”, पालिका निवडणुकीबाबत सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य
-Delhi Vidhansabha: “…तर भाजपच्या २० जागा आल्या नसत्या”, शरद पवारांच्या आमदाराचं मोठं वक्तव्य