पुणे : पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ओंकारेश्वर मंदिराजवळील पूल पाडण्याचा विचार आता महापालिका प्रशासनाने सुरु केला आहे. काही वर्षांपूर्वी नागरिकांच्या सोयीसाठी ओंकारेश्वर ते सिद्धेश्वर-वद्धेश्वर घाटाला जोडलेला हा पूर आता पालिका प्रशासनाने पाडण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व बाबींचा अभ्यास करून याबाबतचा प्रस्ताव पुणे महानगरपालिका प्रशासनाने मंजुरीसाठी ठेवला आहे.
बालगंधर्व रंगमंदिरापासून पुढे गेल्यानंतर शनिवार पेठेकडे जाताना ओंकारेश्वर मंदिर आहे. नारायण पेठ तसेच डेक्कनहून नदीपात्रातून पुणे महानगरपालिकेकडे जाताना वाहन चालकांना ओंकारेश्वर मंदिराकडून जावे लागते. ओंकारेश्वर ते वृद्धेश्वर-सिद्धेश्वर घाटाला जोडणारा हा पूल धोकादायक झाला असून नदीपात्रातील पाण्याला देखील अडथळा ठरत आहे. त्यामुळे हा पूल पाडण्याची तयारी पालिकेने केली आहे. याबाबतचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीमध्ये मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.
५५ वर्षांपूर्वी मुठा नदीपात्रात बांधलेल्या या पूलाचा वापर स्थानिक नागरिक मासे पकडणे, गाड्या धुणे, प्राण्यांची स्वच्छता अशा कारणांसाठी वापरत असतात. हा पूल वाहतूकीसाठी वापरला जात नाही. मात्र, दरवर्षी या पुलामुळे पावसाळ्यात जलपर्णी आणि कचरा अडकला जातो. हा पूल जीर्ण झाला असून आता तो वापरण्यासाठी सुरक्षित राहिला नसल्याचे दिसत आहे.
या पुलाच्या रस्त्यावर वारंवार खड्डे पडतात. या पुलाच्या दुरुस्तीसाठी ३९ लाख रुपयांचा खर्च येणार असून केवळ ८ वर्षेच हा पूल वापरता येऊ शकतो. नदीच्या पाण्याला अडथळा होणाऱ्या हा पूल पाडला तर याचा फायदा महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या नदीकाठ विकसन प्रकल्पाबरोबरच पूरस्थितीच्या काळात होऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या-
-“फडणवीस मुख्यमंत्री होताच राज्यात जातीय तणाव निर्माण करण्याचं षडयंत्र” माजी खासदाराचा गंभीर आरोप
-पुणे महानगर परिवहन महामंडळाचे खाजगीकरण तात्काळ थांबवा अन्यथा…; प्रमोद भानगिरेंचा इशारा
-पवार काका-पुतण्याच्या भेटीने चर्चेला उधाण, दोघे एकत्र येण्यावर बड्या नेत्याचं मोठं विधान
-…अन् पुण्यातील ‘ त्या’ पबवर गृहमंत्री गोपीनाथ मुंडेंनी स्वतः टाकली होती रेड
-महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट