पुणे : सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यातील स्वारगेट स्थानकातील एसटी बसमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. या घटनेला आता दीड महिना झाला असून या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात तब्बल ८९३ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या दोषारोपपत्रातून धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. आपण समलिंग असल्याचा दावा आरोपी दत्ता गाडे याने केला होता तो दावा देखील फोल असल्याचे या दोषारोपपत्रातून उघड झाले आहे.
गुन्हा घडल्यानंतर तब्बल ५२ दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपपत्रामध्ये ८२ साक्षीदार तपासून ५ साक्षीदारांचे जबाब न्यायालयात नोंदवले आहेत. या प्रकरणी एकूण १२ पंचनामे करण्यात आले असून, ५ महत्त्वाच्या पंचनाम्यांतून आरोपी गुन्ह्याच्या वेळी घटनास्थळी हजर असल्याचे थेट आणि घटनेतील भक्कम पुरावे आरोपपत्रात सादर करण्यात आले आहेत.
तपासातील मुद्दे
– शिवशाही बसमध्ये अत्याचार झालेल्या घटनास्थळावर दोघांचे केस व आरोपीच्या शर्टाचे बटण सापडले असून, रासायनिक प्रयोगशाळेच्या तपासणीत ते आरोपी गाडेचेच असल्याचे निष्पन्न झाले आहे.
– आरोपी दत्ता गाडे गुन्ह्याच्या दिवशी स्वारगेट बसस्थानकात पहाटेपासून असल्याचे दिसत होता, तसेच तो पीडितेशी बोलत होता, पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी बोलताना पाहिले असून, त्यांचे जबाब न्यायालयात नोंदवण्यात आले आहेत.
– आरोपी गाडे लैंगिकदृष्ट्या सक्षम असल्याचा अहवाल ससून रुग्णालयाच्या तीन तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
– पीडितेने या अत्याचाराबाबत राज्य परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकांना माहिती देऊन आरोपी गाडेचा शोध घेण्याची विनंती केली होती. या चालक-वाहकांना शोधून पोलिसांनी त्यांचे जबाव न्यायालयात नोंदवण्यात आले आहेत.
– स्वारगेट एसटी स्थानकातील सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपी गाडे घटनास्थळी हजर असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालात नमूद आहे.
– आरोपीच्या मोबाइल नंबरवरून सायबर तज्ज्ञांमार्फत त्याची गुगल सर्च हिस्टरी तपासली. त्यामध्ये आरोपी गाडे वारंवार अश्लील व्हिडिओ पाहात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गुगल सर्च हिस्टरी पंचनामा करण्यात आला.
– ओळख परेडमध्ये पीडित तरुणीने आरोपी गाडेला ओळखले आहे.
महत्वाच्या बातम्या
-‘मी २२ व्या वर्षीपासून सफारी गाडीतून फिरतो, तेव्हा तुम्हाला चड्डी पण…’; पडळकर नेमकं कोणाला म्हणाले?
-पुण्यात दर्गात घुसून राडा; खासदार कुलकर्णींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
-एकही अनधिकृत फ्लेक्स न उभारता साजरा झाला आमदार हेमंत रासनेंचा वाढदिवस
-‘लाड’क्या ठेकेदाराला लगाम, सुरक्षारक्षक पुरवण्याची निविदा विभागून दिली जाणार; नेमकं घडतंय काय?