पुणे : आता पुणे ते सुरत प्रवाशांचा प्रवास आता अधिक सोपा होणार आहे. या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी म्हणजे इंडिगो एअरलाइन्सने आता पुणे विमानतळापर्यंत आपली कनेक्टिव्हिटी पसरवली आहे. इंडिगो एअर लाईन्सने पुणे ते सुरत अशी थेट विमानसेवा प्रवाशांसाठी सुरु केली आहे.
आठवड्यातून ३ दिवस मंगळवार, गुरुवार आणि रविवारी विमानसेवा सुरू करण्यात येणार आली असून आता प्रवाशांना पुणे ते सुरत प्रवास हा किचकट होणार नाही. ३१ मार्च २०२४ पासून ही थेट विमानसेवा सुरू होणार आहे. प्रवाशांना चांगली सुविधा मिळावी आणि त्रासमुक्त प्रवास व्हावा यासाठी ही थेट विमान सेवा सुरु करण्यात आली आहे.
प्रस्थान प्रवासाला एकूण १ तास लागेल आणि परतीच्या प्रवासाला ५५ मिनिटे लागणार असल्याची माहिती मिळत आहे. पुणे ते सुरत हा प्रवास आता वेळेची बचत करणारा ठरणार आहे. या नवीन विमानसेवेमुळे अनेक प्रवाशांना आनंद मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-जागतिक महिला दिनानिमित्त पुण्यात बससेवा मोफत; पीएमपीएमएलकडून खास गिफ्ट
-‘आम्ही राजकारणात हिशोब करायला आलो नाही’; अमित शहांच्या त्या टीकेवर सुळेंची प्रतिक्रिया
-‘आम्ही शिंदे गटाइतक्याच जागा लढणार’; भुजबळांच्या मागणीवर फडणवीसांचं उत्तर म्हणाले ‘कोणी काहीही…’
-पुणे मतदारसंघात ओबीसींची संख्या जास्त; राजकीय समीकरणं बदलणार!