पुणे : पुणे शहरातील पुणे रेल्वे स्थानक, शिवाजीनगर स्थानकात बॉम्बस्फोट करण्याची धमकी एका माथेफिरुने पोलीस नियंत्रण कक्षाला दिली होती. ही धमकी देणाऱ्या माथेफिरुला हडपसर परिसरातील मांजरी भागातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील महत्वाच्या स्थानकांमध्ये बॉम्बस्फोट घडविण्यात येणार असल्याची एकाने दूरध्वनीद्वारे पोलिसांना दिली होती.
पोलिसांनी संबंधित पोलीस ठाण्यांना, बॉम्बशोधक व नाशक पथकला तसेच गुन्हे शाखेला या संदर्भात माहिती कळवली. पोलिसांच्या पथकांनी या सर्व ठिकाणांवर कसून तपासणी आणि नाकाबंदी केली. श्वान पथक आणि बॉम्बशोधक व नाशक पथकाने देखील या ठिकाणी तपासणी केली. मात्र, काहीही संशयास्पद आढळून आले नाही. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बरेचसे मान्यवर यांचे पुण्यामध्ये दौरे होते. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने हा कॉल घेतला. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू वस्तू व व्यक्ती आढळून आली नाही. दरम्यान, पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आलेल्या फोनचा नंबर शोधून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासात पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करणारा आरोपी हडपसरमधील मांजरी भागात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. दारुच्या नशेत त्याने नियंत्रण कक्षात दूरध्वनी करून दिशाभूल करणारी माहिती दिल्याचे तपासात उघडकीस आले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यत येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रवीण पंडित येशी असे गुन्हा दाखल झालेल्या माथेफिरुचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई कल्पना यशवंत घरजाळे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील ११२ क्रमांकावर फोन केला. ‘आज संध्याकाळी पाच वाजता शिवाजीनगर, पिंपरी चिंचवड, पुणे रेल्वे स्टेशन, मुंबईला बांद्रा आणि गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी बॉम्ब फोडण्यात येणार आहे.’ पोलिसांना बॉम्बस्फोटाची धमकी दिल्यानंतर त्याने फोन कट केला.
महत्वाच्या बातम्या-
-भावी अधिकारी पितायत कोट्यावधींचा चहा; सर्वेक्षणातून आली मोठी माहिती समोर
-हडपसरमध्ये रंगला चार दिवसीय राज्यस्तरीय सेना केसरी कुस्तीचा ‘महासंग्राम’
-‘लोकांपर्यंत चिन्ह पोहचवा, विश्वास द्या यश, नक्की मिळेल’; शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना
-“आम्ही कोणाचाही पक्ष चोरला नाही, संसदेत भाषणं ठोकून कामं होत नाहीत”