पुणे : पुणे स्टेशनवरुन आजपर्यंत एकही ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ थेट धावत नाही. पुणे स्टेशनवरुन सुटणारी एकही ट्रेन नव्हती त्यामुळे सोमवारी १६ सप्टेंबरपासून हुबळी-पुणे अशी ‘वंदे भारत’ धावणार होती. ही वंदे भारत आता ट्रेन आठवड्यातून ३ दिवस हुबळी-मिरज-कोल्हापूर- मिरज-पुणे आणि पुणे-मिरज-हुबळी अशी धावणार होती. मात्र आता या ट्रेनला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांना वंदे भारत एक्स्प्रेससाठी पुन्हा प्रतिक्षा करावी लागणार आहे.
येत्या १६ सप्टेंबर रोजी पुणे ते हुबळी अशी वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन होणार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जमशेदपूरमधून या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार होते. मात्र, तिची ट्रायल रन पुढे ढकलण्यात आली असल्याचे पुणे रेल्वे विभागातील जनसंपर्क अधिकारी राम बारपग्गा यांनी दिली आहे. पुणे-हुबळी ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रायल रन ही १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार होती. त्यामुळे आता पुणेकरांना वंदे भारत एक्स्प्रेसची प्रतिक्षा कधीपर्यंत करावी लागणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
‘वंदे भारत एक्सप्रेस पुणे-हुबळी मार्गावर धावणारी ट्रेनमुळे पुणेकर प्रवाशांना १७ तासात ५५८ किमी अंतर पार करणार आहे. ही ट्रेन हुबळी येथून पहाटे ५ वाजता निघणार आहे. दुपारी १:३० वाजता पुण्यात पोहचणार आहे. त्यानंतर पुण्याहून दुपारी २:३० वाजता हुबळीसाठी ही ट्रेन सुटेल. रात्री १० वाजता हुबळीला पोहोचणार असल्याची माहिती राम बारपग्गा यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘दिलीप मोहितेंना आमदार करा, लगेच लाल दिव्याची गाडी देतो’; अजित पवारांच्या वक्तव्यावरुन खळबळ
-जया किशोरी यांच्या हस्ते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती
-गणरायाचे दर्शन अन् विधानसभेची साखरपेरणी, श्रीनाथ भिमाले थेट पोहचले ‘सागर’ बंगल्यावर
-अजित पवारांच्या मेळाव्याला आढळराव पाटलांची दांडी; पुन्हा शिंदेंच्या शिवसेनेत जाणार?
-वनराज आंदेकर प्रकरण: गुन्हे शाखेकडून ८ पिस्तुलं १३ काडतुसे जप्त, अन्…