पुणे : गेल्या काही आठवड्यांपासून पुणेकर कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झाले आहेत. शहरातील किमान तापमान सरासरीच्या पातळीत घसरण झाली आहे. त्यामुळे पुणेकरांना आता उन्हाच्या तडाख्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार ७ आणि ८ एप्रिल रोजी पुणे शहरात हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.
राज्यासह पुणे शहरात प्रचंड उन्हाचा कडाका जाणवत आहे. वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे पुणेकर चांगलेच हैराण झालेले आहेत. दिवसभर कडक ऊन आणि रात्रीच्या हवेतही उष्ण अशा झळा जाणवत आहेत. सरासरी तापमानापेक्षा अधिकच तापमान असल्याने उष्माघात आणि त्वचेच्या समस्याही जाणवू लागल्या आहेत. आता हवामाना खात्याने दिलेल्या माहितीने पुणेकरांच्या जीवात जीव आला आहे.
पुणे शहरातील शिवाजीनगर २९ मार्च रोजी शिवाजीनगर येथे रात्रीचे सर्वाधिक तापमान २३.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे सरासरीपेक्षा ६.१ अंश सेल्सिअसने अधिक आहे. कोरेगाव पार्क, वडगाव शेरी या भागात रात्रीचे तापमान २६ ते २७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदले गेले. १ एप्रिलपर्यंत रात्रीचे तापमान २२ अंश सेल्सिअस असे नोंदले गेले आहे. मात्र, २ एप्रिल रोजी तापमानात ३ ते ४ अंश सेल्सिअसने घट झाली असून शिवाजीनगर येथे १८.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘विकासकामे करणे म्हणजे एक्टिंग करण्यासारखं नाही’; आढळराव पाटलांचा कोल्हेंवर निशाणा
-Pune Lok Sabha Election | पुण्यात वसंत मोरे तर बारामतीत सुप्रिया सुळेंना राहिल पाठिंबा