पुणे : पुणे शहरामध्ये सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वाढत्या ध्वनी प्रदूषणाबाबत अनेक प्रकार समोर येत आहेत. आजूबाजूला वाहनांचा गोंगाट, हॉर्नचा आवाज यामुळे शहरात ध्वनीप्रदूषण होत असले तरी नेमके किती आहे, याची माहिती नागरिकांना नसते. आता आपल्या आजूबाजूला ध्वनी प्रदूषण किती आहे याची माहिती आता पुणेकरांना मिळणार आहे.
पुणे शहरामध्ये मध्यवर्ती ४ ठिकाणी ध्वनी प्रदूषणाची पातळी दर्शवणारे डिजीटल फलक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून लवकरच लावण्यात येणार आहेत. शहरात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, हडपसरमधील टाटा हनीवेल कंपनी, नवी पेठेतील इंद्रधनुष्य कार्यालय या ४ ठिकाणी हे डिजिटल फलक लावण्यात येत आहेत. या फलकांवर तेथील प्रत्यक्ष ध्वनिप्रदूषणाची पातळी दर्शविण्यात येणार आहे.
ध्वनिप्रदूषणामुळे डोकेदुखी, ऐकायला कमी येणे, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि निद्रानाश यांसारख्या समस्या निर्माण होतात. नागरिकांना ध्वनिप्रदूषणाची माहिती नागरिकांना असणे गरजेचे असते. पुणेकरांना ही माहिती मिळावी म्हणून महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने ध्वनी प्रदूषण दर्शवणारे माहिती फलक लावण्याचा निर्णय घेतला आहे. आता या डिजीटल फलक बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे गणेशोत्सव: शहरातील ‘हे’ मुख्य रस्ते आजपासून बंद; पर्यायी मार्ग कोणते?
-मद्यधुंद नशेत चालकाने मनसे पदाधिकारी, त्यांच्या पत्नीच्या अंगावर घातला टेम्पो अन्…
-वनराज आंदेकर प्रकरणी मोठा ट्वीस्ट; ‘त्या’ आरोपीलाही ठोकल्या बेड्या
-ऐन विधानसभेच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; ‘हा’ माजी आमदार हाती घेणार ‘तुतारी’