पुणे : पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. शहरामध्ये झिका व्हायरसची लागण झालेल्यांची रुग्णांची संख्या वाढत आहे. दिवसेंदिवस झिकाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. आता रुग्णांची संख्या ५२ वर पोहचली असून आतापर्यंत झिका लागण झालेल्या ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शहरातील एरंडवणे क्षेत्रिय कार्यलायाच्या परिसरामध्ये ११ रुग्ण आढळले आहेत. खराडीमध्ये ६, पाषाणमध्ये ५ सुखसागरनगर ४, मुंढव्यामध्ये ४, आंबेगाव बुद्रुकमध्ये ३, घोले रस्ता ३, कळस, २, धनकवडी लोहगाव, ढोले पाटील रस्ता, वानवडी येथे प्रत्येकी १ अशी शहरातील झिकाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आहे. कोथरुडमधील गुजरात कॉलनी, खराडीतील शिवाजी चौक, सेनापती बापट रस्त्यावरील मंगलवाडी अशी ३ नवीन रुग्णांची नोंद शहरात गुरुवारी झाली आहे.
शहरामध्ये झिकाची रुग्णसंख्या वाढत असताना पुणेकरांनी काळजी घेणे महत्वाचे आहे. शहरातील ४ जणांचा मृत्यू झाला. या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी सार्वजिनक आरोग्य विभागाची समिती परिक्षण करणार आहे. त्यातून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Kasba Vidhansabha: मैदानात कोण उतरणार? भाजपसह काँग्रेस, शिवसेना, मनसेत इच्छुकांची भाऊगर्दी
-मनोज जरांगे विधानसभा लढवण्यावर ठाम; पुण्यातील सर्व मतदारसंघाचा घेतला आढावा
-उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेवरुन चंद्रकांत पाटलांचा सणसणीत टोला; म्हणाले, ‘त्यांच्या भाषणात…’
-पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या शहराध्य पदाचा तिढा काही सुटेना!