पुणे : पुणे शहरामध्ये झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना दिसत आहे. शहरामध्ये आतापर्यंत झिका व्हायरसची लागण झालेले ७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता पुणेकरांनी काळजी घेणे गरजेचे आहे. महापालिकेकडून प्रादुर्भाव रोखण्यासाठी इनडोअर फॉगिंग करण्यात येत आहे. अशी माहिती महापालिकेच्या प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बलिवंत यांनी दिली आहे.
शहरातील एरंडवणे येथील २ गर्भवतींना आणि कोथरूडच्या एकाला झिकाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पुण्यात झिकाचा धोका वाढताना दिसत आहे. डासांपासून हा आजार पसरत असून पुणेकरांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आफ्रिका, अमेरिका आणि दक्षिण भारतात आढळतो. मात्र लागण झालेल्या रुग्णांनी कुठेही प्रवास केलेला नाही, त्यामुळे भारतामध्ये आणि तेही पुण्यातच झिका आला कुठून हा मोठा प्रश्न आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसचे रुग्ण देखील भारतामध्ये केरळनंतर पुण्यातच सापडत असल्याने आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ताप, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे, अंगावर पुरळ उठणे अशी झिकाची लक्षणे आहेत. त्यामुळे डासांपासून सावध रहा.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Hit & Run: आरोपीच्या वडिल, आजोबांना जामीन मंजूर; विशाल अग्रवालची पोलीस कोठडी कायम
-मोठी बातमी: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’त मोठे बदल; शिंदेंची विधानसभेत घोषणा
-अंबादास दानवे जनतेच्या न्यायालयात जाणार; प्रवीण दरेकर म्हणाले, ‘महिलांच्या चपला खायच्या असतील तर…’
-अंबादास दानवेंची सभागृहात शिवीगाळ, उद्धव ठाकरेंनी मागितली माफी; ‘मी आई-बहिणींची माफी मागतो, पण…’